Wednesday, November 24, 2010

Changes in UPSC Exams (CSAT)


बुधवार, २४ नोव्हेंबर २०१०(Loksatta)
समाजात घडणाऱ्या बदलांमुळे प्रशासनासमोरची आवाहनेही बदलतात. परिणामी ही आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी आवश्यक गुण-कौशल्ये प्रशासकांना आत्मसात करावी लागतात. भारताचा विचार करता १९९१ चे उदारीकरणाचे धोरण, जागतिकीकरणाचा प्रसार, लोकशाहीकरणाची वाढती प्रक्रिया, जनमानसात निर्माण होणारी जाणीव-जागृती इ. प्रक्रियांमुळे शासन-प्रशासनासमोरील परिस्थिती बदलली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना या बदलास पचवून, त्यास यशस्वीपणे सामोरे जाता यावे या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा निर्माण करावी लागते. ही बाब लक्षात घेऊनच यूपीएससीने आपल्या परीक्षा पद्धतीत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) दरवर्षी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून भारतीय प्रशासकीय, पोलीस, परराष्ट्र, महसूल इ. विविध गट अ, गट ब सनदी सेवापदी पात्र व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीन टप्प्यांत विभागलेल्या या (यूपीएससी) परीक्षेच्या माध्यमातून पात्र उमेदवार निवडले जातात.
अर्थात, प्रशासनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळण्यास सक्षम उमेदवार हवा. या परीक्षेद्वारे ही क्षमता तपासली जाते. स्वाभाविकच या परीक्षेचा अभ्यासक्रम ही क्षमता तपासण्यासाठी पायाभूत व निर्णायक ठरतो. समाजात घडणाऱ्या बदलांमुळे प्रशासनासमोरची आवाहनेही बदलतात. परिणामी ही आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी आवश्यक गुण-कौशल्ये प्रशासकांना आत्मसात करावी लागतात. भारताचा विचार करता १९९१ चे उदारीकरणाचे धोरण, जागतिकीकरणाचा प्रसार, लोकशाहीकरणाची वाढती प्रक्रिया, जनमानसात निर्माण होणारी जाणीव-जागृती इ. प्रक्रियांमुळे शासन-प्रशासनासमोरील परिस्थिती बदलली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना या बदलास पचवून, त्यास यशस्वीपणे सामोरे जाता यावे या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा निर्माण करावी लागते. ही बाब लक्षात घेऊनच यूपीएससीने आपल्या परीक्षा पद्धतीत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

या वर्षीपासून लागू होणारा हा बदल
(१)    यापूर्वी यूपीएससी पूर्वपरीक्षेत, एक वैकल्पिक विषय व दुसरा सामान्य अध्ययनाचा असे दोन पेपर्स अंतर्भूत होते. आता त्याऐवजी एक ‘सामान्य अध्ययना’चा व दुसरा ‘नागरी सेवा कल चाचणी’ (सिव्हिल सव्‍‌र्हिसेस अ‍ॅप्टीटय़ूड टेस्ट- सीसॅट) असे दोन पेपर्स असतील. थोडक्यात वैकल्पिक विषय काढून टाकण्यात आला असून, नागरी सेवा कलचाचणी या नव्या पेपरचा समावेश केला आहे.
(२)    प्रस्तुत दोन्ही पेपर्स प्रत्येकी २०० गुणांचे असतील व त्यासाठी प्रत्येकी दोन तासांचा कालावधी निर्धारित केला आहे.
(३)    मात्र या पेपर्समध्ये एकूण किती प्रश्न असतील व त्यांची गुणविभागणी कशी असेल हे अद्यापही निर्धारित केलेले नाही.
(४)    तथापि, दोन्ही पेपर्स हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेले असतील. या प्रश्नांचे नमुने यूपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील, असे आयोगाने घोषित केले आहे.
(५)    सामान्य अध्ययनाचा पूर्वीचा पेपर कायम ठेवला असला तरी त्यात अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
(अ)    राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी; भारताचा इतिहास व भारतीय स्वातंत्र्यलढा; भारताचा व जगाचा भूगोल (प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक) आणि सामान्य विज्ञान हे पूर्वीचे अभ्यासघटक जशास तसे नमूद केले आहेत.
(ब)    मात्र पूर्वीच्या भारतीय राज्यघटनेऐवजी आता भारतीय राज्यव्यवस्था व कारभारप्रक्रिया असा उल्लेख केला आहे. यात राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायतीराज, सार्वजनिक धोरण आणि नागरिकांच्या हक्कांसंबंधी मुद्दे या घटकांचा समावेश केला आहे.
(क)    भारतीय अर्थव्यवस्था या शब्दप्रयोगाऐवजी ‘आर्थिक आणि सामाजिक विकास’ असे शीर्षक उपयोजिले आहे. ज्यात चिरंतन विकास, दारिद्रय़, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार या घटकांचा अंतर्भाव केला आहे.
(ड)    पर्यावरणीय परिस्थिती, जैवविविधता आणि हवामान बदल यासंबंधी सर्वसाधारण कळीचे मुद्दे हा घटक नव्यानेच नमूद केला आहे.
द्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी परीक्षेच्या प्रस्तुत पूर्व, मुख्य व मुलाखत या तीन टप्प्यांपैकी सद्यस्थितीत केवळ पूर्वपरीक्षेच्या संदर्भातच बदल केलेले आहेत. २०११ च्या पूर्वपरीक्षेपासून म्हणजे या वर्षीपासून लागू होणारा हा बदल पुढीलप्रमाणे लक्षात घेता येतो.
त्यामुळे सामान्य अध्ययनाची तयारी करताना जुन्याच पद्धतीचा अवलंब न करता अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या नव्या अभ्यास घटकांचा विचार करून आपल्या अभ्यास पद्धतीत बदल करणे अत्यावश्यक आहे. एनसीईआरटीची पायाभूत पुस्तके; द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस ही वर्तमानपत्रे; फ्रंटलाईन व योजना आणि भारतीय सरकारचे ‘इंडिया इयर बुक’ हे संदर्भग्रंथ, तसेच त्या त्या घटकांवरील प्रमाणित पुस्तकांचा अवलंब करून सामान्य अध्ययनाची तयारी करावी.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहता ‘नागरी सेवा कल चाचणी’चा केलेला समावेश हा संपूर्णत: नवा बदल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काहीशी भीती निर्माण झाल्याचे चित्र आहे. विशेषत: मराठी माध्यमाच्या व ग्रामीण पाश्र्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पेपर आव्हानात्मक वाटू शकतो. तथापि या पेपरमध्ये समाविष्ट केलेल्या सर्व अभ्यास घटकांचा पद्धतशीर विचार करून ४-५ महिने दररोज तयारी केल्यास हा पेपरदेखील सुलभ बनवता येतो.
अशा सात अभ्यास घटकांचा समावेश केला आहे. अर्थात यूपीएससीने हा अभ्यासक्रम समाविष्ट करताना अंकगणितीय कौशल्ये व इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये हे घटक ‘दहावी’च्या दर्जाचे असतील हेही नमूद केले आहे. या नव्या विषयाची तयारी करताना गोंधळून न जाता विद्यार्थ्यांनी प्रत्येक अभ्यास घटकाचा अर्थ समजून घ्यावा व त्यानुसार भरपूर व नियमित सरावाद्वारे या विषयाची तयारी करावी. सर्वसाधारणत: अनेकांना असे वाटते की, एमबीएसाठी ज्या पात्रता परीक्षा घेतल्या जातात तशाच प्रकारे ही कलचाचणी अवघड असणार. त्यामुळे गणित, बुद्धिमापन चाचणी व इंग्रजीची सवय असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा विषय सुलभ ठरेल. तथापि या विषयाचे मानक ‘दहावी’च्या पातळीवरील असल्याकारणाने विद्यार्थ्यांना भीती बाळगण्याचे कारण नाही. अशी पाश्र्वभूमी नसणारा विद्यार्थी सरावाद्वारे चांगली तयारी करू शकतो.

चाचणी कल
(१)    आकलन कौशल्य (Comprehension)
(२) व्यक्ती-व्यक्तीतील संवाद, संभाषण व इतर कौशल्ये (Interpersonal Skills Including Communication Skills)
(३)    तार्किक विचार व विश्लेषणात्मक क्षमता (Logical Reasoning and Analytical Ability)
(४)    निर्णय प्रक्रिया व समस्यांची सोडवणूक (Decision Making and Problem Solving)
(५)    सामान्य बुद्धिमत्ता चाचणी (General Mental Ability)
(६)    मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण (Basic Numeracy and Data Interpretation)
(७)     इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य (English Language Comprehension Skills)

प्रस्तुत कलचाचणी विषयाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी पुढील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक, या पेपरमध्ये इंग्रजी भाषेचे आकलन या पेपरमधील आकलन कौशल्य, संभाषण-संवाद कौशल्ये, निर्णयप्रक्रिया व इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये या अभ्यास घटकांच्या बाबतीत महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात इथे निबंधवजा प्रश्न नसल्याने इंग्रजी भाषेतून काहीही लिहायचे नाही, तर पेपरमधील इंग्रजी भाग वाचून त्यावरील प्रश्नांखाली दिलेल्या अचूक पर्यायाची निवड करायची आहे. त्यामुळे किमानपक्षी इंग्रजी वाचून त्यातील आशय समजण्याइतपत इंग्रजीचे ज्ञान अवगत करणे अत्यावश्यक ठरते. अर्थात यूपीएससीची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी (मराठी माध्यमातील विद्यार्थीदेखील) हिंदू, एक्स्प्रेस यांसारखी इंग्रजी वर्तमानपत्रे व फ्रंटलाईन, योजना, इंडिया इयर बुकसारखे इंग्रजीतील संदर्भ साहित्य वाचत असल्याने इंग्रजीबाबत भय बाळगण्याचे कारण नाही. मात्र आता हे संदर्भ साहित्य वाचताना इंग्रजी आकलनाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. म्हणजे योग्य शब्द, त्यांचे अर्थ, व्याकरण, त्यातील घटक याचा रीतसर अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. नियमित वाचन व भरपूर सरावाच्या माध्यमातून कोणत्याही विद्यार्थ्यांला इंग्रजी भाषेचे आकलन लागणार आहे. आकलनाबरोबरच संवादात नेमक्या सूचित बाबींचे आकलन उमेदवारात आहे की नाही, त्याचा प्रतिसाद योग्य आहे की नाही आणि त्याच्याकडे नेतृत्व गुण आहेत का, इ.ची चाचपणी केली जाणार आहे. अशा प्रकारच्या घटकांचा समावेश असणाऱ्या संदर्भ साहित्याचे भरपूर वाचन व प्रश्नांचा सराव केल्यास हे कौशल्य अवगत होईल यात शंका नाही.
तार्किक विचार व विश्लेषणात्मक क्षमतेवर आधारित प्रश्नांना अनेक विधाने दिली जातील आणि त्या विधानाशी निगडित निष्कर्ष पर्यायात अंतर्भूत केले जातील. अर्थात यासाठी विद्यार्थ्यांच्या तार्किक विचार व पृथ्थकरणाची क्षमता महत्त्वाची ठरणार आहे. भरपूर सरावाद्वारेच असे कौशल्य आत्मसात करता येईल.
‘प्रकरण अभ्यासा’च्या पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांची निर्णय व समस्यांची उकल करण्याची क्षमता तपासली जाणार आहे. विद्यार्थी एखाद्या परिस्थितीत निर्णय कसे घेतो? त्यावेळी परिस्थितीच्या सर्व बाजू लक्षात घेतो का? त्यांच्या परिणामांचा विचार करतो का? उपलब्ध पर्यायाची कशी तुलना करतो? आणि अंतिमत: समस्येची उकल अपेक्षितपणे करतो का? या बाबी तपासल्या जातील. या घटकाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे भोवतालच्या परिस्थितीचे आकलन, त्यातील बारकावे, समस्या व उपाय यासंबंधी ज्ञान निर्णायक ठरणार आहे.
वास्तविक पाहता सामान्य अध्ययनाच्या जुन्या अभ्यासक्रमात सामान्य बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अंतर्भूत होताच. मात्र अनेक विद्यार्थी या घटकाची तयारी फारच कमी करत असत. आता मात्र याची तयारी करावी लागणार आहे. संख्याश्रेणी व पायाभूत गणितीय कौशल्यावर आधारित हा घटक नियमित व भरपूर सरावाच्या माध्यमातून पद्धतशीररीत्या तयार करता येतो. त्याचप्रमाणे मूलभूत अंकगणितीय कौशल्ये व सामग्री विश्लेषणाची तयारी करताना सरावास पर्याय नाही. अंकगणितीय कौशल्यात विविध प्रकारची गणिते, त्यातील सूत्र व पद्धती यांचा सराव केल्यास हा घटक चांगल्या रीतीने तयार करता येईल. सामग्री विश्लेषणातील तक्ते, आलेख व सांख्यिकी माहिती यांचे काळजीपूर्वक व विचारपूर्वक वाचन महत्त्वाचे आहे.
शेवटी इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य आत्मसात करताना वर नमूद केल्याप्रमाणे शब्दसंग्रह; वाक्यरचना, तिचे विविध प्रकार, वाक्यात योग्य व अचूक शब्दांचा वापर, इंग्रजी व्याकरण या बाबी मध्यवर्ती असतील.
एकंदर ‘नागरी सेवा कल चाचणी’ हा विषय मुख्यत: नियमित व भरपूर सरावावर आधारित आहे हे लक्षात येते. जशी सामान्य अध्ययनात भरपूर वाचन करून त्यातील माहिती लक्षात ठेवावी लागते तशी बाब या पेपरच्या बाबतीत आढळत नाही. दुसऱ्या बाजूला किमान वेळेत प्रश्नांची उकल ही बाबही महत्त्वाची ठरणार आहे. थोडक्यात वेळेचा मुद्दा निर्णायक ठरणार आहे. सराव हेच यावरील उत्तर आहे.
एकंदर या बदलाचा स्वागतार्ह पाऊल म्हणून स्वीकार करून विद्यार्थ्यांनी त्याच्या तयारीस प्रारंभ केला पाहिजे. इंग्रजी व अंकगणितीय बाबींना न भिता नियमित व भरपूर सरावाद्वारे या पेपरसाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करता येतात यात शंका नाही. तेव्हा तुमच्या तयारीस शुभेच्छा!

    No comments:

    Post a Comment