Wednesday, January 5, 2011

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०११







नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Pubile service commission) मुंबईने वर्ग- १, वर्ग २ अधिकारी वर्गाची भरती करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर (३५ जिल्ह्य़ातून) रविवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०११ रोजी राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०११ परीक्षेचे आयोजन केले आहे. यासाठी पदवीधर उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक १० जानेवारी २०११ पर्यंत अर्ज मागविले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर (website) उपलब्ध आहेत.

राज्यसेवा (पूर्व) परीक्षा २०११ ची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे-
१) पदाचे नाव- पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (गट अ), गट विकास अधिकारी, नायब- तहसीलदार (गट ब) व इतर पदे.

२) पदसंख्या - पदवार पदसंख्या पुढीलप्रमाणे आहेत-
१) पोलीस उपअधीक्षक/ सहायक पो. आयुक्त - एकूण ३२ पदे
२) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी - ५ पदे,
३) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा - एकूण ७६ पदे)
४) उपअधीक्षक - भूमि अभिलेख - एकूण ४ पदे,
५) नायब तहसीलदार - एकूण १२६ पदे,
६) गट विकास अधिकारी - एकूण २ पदे.

३) वेतनश्रेणी - गट अ पदांकरिता रु. १५६००-३९१०० अधीक ग्रेड पे, तसेच गट ब पदांकरिता रु. ९३०० - ३४८०० अधिक ग्रेड पे व नियामानुसार भत्ते.

४) वयोमर्यादा - दिनांक १ एप्रिल २०११ रोजी किमान १९ वर्षे असावे व ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांकरीता SC/ST/NT/OBC वय ३८ वर्षांपर्यंत)

५) शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्या अर्हताधारक असावा.

६) परीक्षा फी/शुल्क - जनरल/ अ मागाससाठी
रु. २६०/ व मागासवर्गीयांसाठी रु. १३५/- हे परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्जाची नोंदणी केल्यावर प्राप्त होणाऱ्या विहित चलनाद्वारे भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोख भरावे. (cash payment in SBI Br.)

७) अर्ज करण्याची पद्धत - राज्य सेवा (पूर्व) परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा. वेब बेस्ड (web based) ऑन लाईन अर्ज www.mpsconline.gov.in या वेबसाईटवर १० जानेवारी, २०११ या कालावधीत सादर करावा. (वेबसाईटवर अर्ज टाईप करून २ील्ल िकरावा व त्याची Print-out काढावी) अधिक मदतीसाठी आयोगाने मे. वास्ट इंडिया प्रा. लि. ची नेमणूक केली आहे. त्यांचा क्र. ९७५७४४४०२० आहे. त्यासाठी रु. २४/- सव्‍‌र्हिस चार्ज द्यावा लागेल. अर्ज online केल्यावर स्टेट बँकेत जाऊन परीक्षा फी रोख भरावी व त्यांच्याकडून Transaction ID हा नंबर अर्जावर अचूकरीत्या नोंदवावा (सविस्तर माहिती) MPSC च्या वेबसाईटवर उदा. www.mpsc.gov.in किंवा www.mpsconline.gov.in वर उपलब्ध आहे.

८) मार्गदर्शन वर्ग - राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे वर्ग
व स्टडी मटेरियल, पुस्तके पुढील केंद्रावर उपलब्ध आहे.
स्पर्धा परीक्षा केंद्र, द्वारा - प्रदीप क्लासेस, ४०८ सोमवार पेठ शाहू उद्यानामागे, संत गाडगेमहाराज मठ रस्ता, भाजीमंडईजवळ, पुणे ४११०११ मो.बा. ९५६१३४५१२९.

९) परीक्षा केंद्र - परीक्षेसाठी महाराष्ट्रात ३५ जिल्ह्य़ात केंद्रे आहेत. उदा. पुणे (कोड नं. ३८, मुंबई ३० (मध्य) मुंबई पश्चिम ३१, ठाणे ४३, नागपूर ३२ वगैरे).

१०) राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप- ही एक चाळणी परीक्षा आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे सहा घटक व २२ उपघटकांमध्ये विभाजन केलेले आहे.
उदा.
१) कला शाखेतील घटक.
२) विज्ञान व आभियांत्रिकी शाखेतील घटक
३) वाणिज्य व अर्थव्यवस्था या विषयाचे घटक
४) कृषिविषयक घटक.
५) जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी.
६) बुद्धिमापन विषयक घटक

पूर्व परीक्षेसाठी एक पेपर असतो (सामान्य क्षमता चाचणी) या पेपरमध्ये २०० प्रश्न असतात व ते २ तासांत सोडवावे लागतात. पेपरचे माध्यम मराठी व इंग्रजी आहे. पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते हे लक्ष्यात घ्यावे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मुख्य परीक्षेसाठी कॉल लेटर मिळते. मुख्य परीक्षा १६०० गुणांची असते. यामध्ये सहा विषय आहेत. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर २०० गुणांची मुलाखत घेण्यात येईल. त्यानंतर मेरिटनुसार निवड यादी तयार करतात.

परीक्षेसाठी उपयुक्त प्रकाशने-
१) निराली प्रकाशन व प्रगती प्रकाशनाची पुस्तके,
२) के. सागर प्रकाशन,
३) स्टडी सर्कल, 
४) युनिक प्रकाशन, 
५) किरण बुक्स प्रकाशन, 
६) चाणक्य मंडल प्रकाशन,
६) एनसीआरटी प्रकाशन,
७) इतर सरकारी प्रकाशने.

उमेदवारांनी या परीक्षेसाठी अवश्य प्रयत्न करावा. ही परीक्षा वर्षांतून एकदाच येते. प्रशासनात डायरेक्ट सहायक पोलीस आयुक्त, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी पदे मिळविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न, कठोर परिश्रम, जिद्द, वेळेचे नियोजन, चांगले मार्गदर्शन, चांगले स्टडी मटेरियल व पुस्तकांचे वाचन, मनन, केल्यास या परीक्षेत निश्चितच यश मिळेल.

Source--Loksatta

No comments:

Post a Comment