Sunday, September 2, 2012

(मार्क्‍सवाद, गांधीवाद, फुले-आंबेडकरवाद, भारतीय स्‍वातंत्र्य चळवळ व जगाची ओळख)

विषय
1. वर्ण व जातिव्‍यवस्‍थेचा उदय, व जातिअंताचा संघर्ष
2. फुले-आंबेडकर वाद
3. मार्क्‍सवाद
4. स्‍वातंत्र्य चळवळीचा इतिहास
5. संविधान निर्मिती, फाळणी व संस्‍थाने खालसा
6. 1950 चे जग
7. शीतयुद्धोत्‍तर जग
8. स्‍वातंत्र्योत्‍तर भारताची वाटचाल
मुद्दे व उपमुद्दे
· आधुनिक विचारसरणी या कल्‍पनावादी नसून भौतिकवादी आहेत
· समाजशास्‍त्र व निसर्गशास्‍त्रातला फरक
· मानवाचा इतिहास
o टोळी, गणसंस्‍था - प्राथमिक साम्‍यवाद, लोकशाही
o गुलामी, सरंजामशाही, भूदास
o भांडवलशाही – औद्योगिक क्रांती, युरोपातल्‍या राज्‍यक्रांत्‍या, आधुनिक लोकशाही तसेच स्‍वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्‍यत्रयींचा उदय
o खाजगी मालकी, कुटुंबसंस्‍थेचा उदय, शासन
o पाया व इमला
· वर्णव्‍यवस्‍था – प्रारंभी गुण व कर्मावर आधारित समाज संघटन
· जातिव्‍यवस्‍था – भारतीय उपखंडातील वैशिष्‍ट्य, जातींच्‍या निर्मितीसंबंधीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुकरणाचा सिद्धांत, जातीची लक्षणे
· जातिअंताची चळवळ
o बुद्धकाळ – गणसंस्‍था व राजेशाहीचा संधिकाल, बुद्धाचे जीवन व विचार
o संतांचे योगदान
o इंग्रजांच्‍या आगमनाबरोबर आलेल्‍या नवविचार व आर्थिक-भौतिक उलथापालथींनी जातिव्‍यवस्‍थेला दिलेला धक्‍का
o आ‍धी राजकीय की आ‍धी सामाजिक, हा वाद
o महात्‍मा फुले, छ. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जातिअंतविषयक विचार व कार्य
o जातिव्‍यवस्‍थेचे आजचे स्‍वरुप व तिच्‍या अंताच्‍या चळवळीतले अडथळे
· महात्‍मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जातिअंताव्‍यतिरिक्‍तचे कार्य व विचार
o म. फुले - स्त्रियांची शाळा, विधवांच्‍या बाळंतपणासाठीचा आश्रम, सत्‍यशोधक समाज
o डॉ. आंबेडकर – स्त्रियांविषयीचे विचार, हिंदू कोड बिल, अर्थ व समाजशास्‍त्रविषयक लेखन
· महात्‍मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या भूमिकांतले भेद, पुणे करार
· डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीबाबतची भूमि‍का व रिपब्लिकन पक्षाची संकल्‍पना
· आरक्षण
o दलित, आदिवासींना लोकसंख्‍येतील प्रमाणानुसार आरक्षण
§ राष्‍ट्रीय पातळीवरः दलित - 13 टक्‍के, आदिवासी - 9 टक्‍के (राज्‍यपातळीवर तेथील लोकसंख्‍येतील प्रमाणाच्‍या आधारे)
o 49 टक्‍क्यांपेक्षा अधिक राखीव जागा ठेवण्‍याची अनुमती घटना देत नसल्‍याने ओबीसींना 27 टक्‍के आरक्षण
o दलित, आदिवासींना शिक्षण, नोकरी व राजकीय प्रतिनिधीत्‍व यात आरक्षण आहे. ओबीसींना राजकीय प्रतिनिधीत्‍वाबाबत फक्‍त स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांत आहे. लोकसभा, विधानसभांमध्‍ये नाही.
o स्त्रियांना स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये प्रारंभी 33 टक्‍के व आता 50 टक्‍के आरक्षण
§ लोकसभा व विधानसभेतील 33 टक्‍के आरक्षणासाठी राज्‍यसभेत विधेयक संमत, अजून लोकसभेची मंजुरी बाकी
§ लढा चिवट, सर्वपक्षीय पुरुषी विरोध
§ हे आरक्षण आधीच्‍या प्रत्‍येक आरक्षणाला उभा छेद देणार असल्‍याने दलित, आदिवासींच्‍या आरक्षणात 33 टक्‍के आरक्षण दलित, आदिवासी स्त्रियांना राहणार आहे. ओपनमध्‍ये ओपनमधील स्त्रियांना 33 टक्‍के आरक्षण असणार आहे.
o जातींची जनगणना
· मार्क्‍सवादाची सूत्रे व संकल्‍पना
o मार्क्‍स व एंगल्‍सच्‍या कालखंडाचे वैशिष्‍ट्य
o विरोधविकासवाद, ऐतिहासिक भौतिकवाद
o व्‍यापारी भांडवलशाही, औद्योगिक भांडवलशाही व वित्तिय भांडवलशाही
o साम्राज्‍यवाद, समाजवाद
o उत्‍पादन साधन
o वर्ग, विक्रेय वस्‍तू, श्रमशक्‍ती, क्रयशक्‍ती, वरकड, नफा
o भांडवलाचे केंद्रीकरण, उर्वरित समाजाचे दरिद्रीकरण
o अतिउत्‍पादनाचे अरिष्‍ट, मंदी
o शासनाचे 4 स्‍तंभ
o मानवाचा ज्ञात इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास
· सोव्हिएत युनियन व चीन मधील राज्‍यक्रांतीची तोंडओळख
· भारतीय स्‍वातंत्र्य चळवळ व समतेचा लढा
o 1623 – र्इस्‍ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन, 1757- प्‍लासीची लढाई, अनेक राज्‍ये खालसा, 1857 चे बंड, र्इस्‍ट इंडिया कंपनी जाऊन राणीचे राज्‍य आले
o 1885 – राष्‍ट्रीय सभेची स्‍थापना, प्रशासकीय सुधारणांचा आग्रह, वार्षिक अधिवेशनांची सुरुवात
o वंगभंग (1905), मुस्लिम लीगची स्‍थापना, लो. टिळकांना 6 वर्षांची शिक्षा, गिरणी कामगारांचा संप, स्‍वदेशी, बहिष्‍काराची चळवळ, जहाल-मवाळ वाद
o हिंदू-मुस्लिम तणाव (1909), लखनौ करार (1916), होमरुल चळवळ, चंपारण सत्‍याग्रह, रौलेट अॅक्‍ट, जालियनवाला बाग हत्‍याकांड, असहकार चळवळ (1920), चौरीचौरा, सायमन कमिशन
o 1929 – संपूर्ण स्‍वातंत्र्याचा लाहोर येथील ठराव, सविनय कायदेभंग, दांडीयात्रा
o 1935 – पहिली प्रांतीय निवडणूक, जागतिक फॅसिझमला विरोध, 1942 – चलेजाव आंदोलन, 1946 – नाविकांचे बंड
o सिमला परिषद निष्‍फळ, धर्माधारित फाळणी निश्चित, बंगालमध्‍ये धार्मिक दंगली
o 1947 – स्‍वातंत्र्य व फाळणी
· भारतीय स्‍वातंत्र्य चळवळीतील महत्‍वाचे आयाम व घटना
o समाजसुधारणांच्‍या चळवळीः ईश्‍वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे
o सशस्‍त्र क्रांतिकारी चळवळीचे टप्‍पे
o कम्‍युनिस्‍ट पक्ष, राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ यांची स्‍थापना
o मीरत कट खटला
o ट्रेड युनियन कायदा संमत, गिरणी कामगारांचा 1928 चा ऐतिहासिक संप, 1939 चे महागाई भत्‍ता आंदोलन
o खान अब्‍दुल गफारखान, लाल डगलेवाल्‍यांची चळवळ, धर्माच्‍या आधारावर फाळणीला विरोध
o राष्‍ट्रीय भांडवलदार
o म. गांधी – अस्‍पृश्‍यता निवारण, स्त्रियांची चळवळीत भागिदारी, हिंदू-मुस्लिम ऐक्‍य, विश्‍वस्‍त संकल्‍पना, लढ्याची असहकार, सत्‍याग्रह ही नवी आयुधे, जीवनातल्‍या सर्व प्रश्‍नांभोवती संघटन
· संविधान निर्मिती, फाळणी व संस्‍थाने खालसा (1946 ते 1950)
o संविधान समितीची स्‍थापना, स्‍वरुप तसेच मतमतांतरांची घुसळण
o संस्‍थाने खालसा (500 च्‍या आसपास), प्रजा परिषदांची चळवळ (म्‍हैसूर, काठियावाड, ओरिसा), हैद्राबाद स्‍वातंत्र्य संग्राम, काश्‍मीर टोळीवाल्‍यांचे आक्रमण, भारतीय सैन्‍याचा हस्‍तक्षेप, 370 वे कलम
o फाळणीनंतरच्‍या प्रचंड दंगली व कत्‍तली, पूर्व व पश्चिम पाकिस्‍तानमधून लाखो निर्वासितांचे लोंढे व त्‍यांचे पुनर्वसन
o राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघातर्फे हिंदूंचे संघटन, 1948 – म. गांधींची हत्‍या, तेलंगणा सशस्‍त्र उठाव, ईशान्‍य भारतातील आसाम व अन्‍य जमाती, टोळ्या प्रदेशांचे विलिनीकरणाचे प्रश्‍न
· 1950 चे जग
o 1945 – दुसरे महायुद्ध समाप्‍त, 1946 – अमेरिकेने जपानवर अणुबॉम्‍ब टाकले, युद्धामुळे युरोप खिळखिळे, अनेक गुलाम राष्‍ट्रे स्वतंत्र होण्‍याचा क्रम
o 1945 – संयुक्‍त राष्‍ट्रसंघाची स्‍थापना, 1949 – नाटो स्‍थापना, 1948 – गॅट करार, 1944 – आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीची स्‍थापना, जागतिक बँक
o 1955 – अलिप्‍ततावादी चळवळ, बांडुंग परिषद, पंचशील तत्‍त्‍व, भारताचा पुरस्‍कार
o शीतयुद्ध – अमेरिका, सोव्हिएत यांचे अनुक्रमे पाकिस्‍तान व अफगाणिस्‍तानात सैन्‍य, अमेरिकेची मूलतत्‍तवाद्यांना धार्मिक चिथावणी, शस्‍त्र व आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, तालि‍बान्‍यांचा उदय
· शीतयुद्धोत्‍तर जग (1991 ते 2011)
o 1991 – सोव्हिएत युनियनचे विघटन – एक राजकीय तत्त्वप्रणाली संपल्‍याचा दावा – जग एकखांबी की बहुखांबी – जागतिकीकरणः एक की दोन प्रकारचे – भांडवलाला मुक्‍त प्रवेश पण श्रमाला (कामगारांना) निर्बंध
o 21 व्‍या शतकात लॅटिन अमेरिकेत नवीन राजकीय समीकरणे, अमेरिकन वर्चस्‍व झुगारले
o युरोपातल्‍या 17 देशांचे मिळून एकच चलन – युरो
o गॅटची जागा जागतिक व्‍यापार संघटनेने घेतली (WTO)
o जागतिक हितसंबंधांची नवीन जुळणी – G – 20, SAFTA, BRIC, IBSA इ.
o अमेरिकन ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्‍ला, अमेरिकेचे जगाला दहशतवादविरोधी आवाहन, इराक, अफगाणवरील अमेरिकेचे हल्‍ले, ‘दहशतवाद म्‍हणजे इस्‍लामिक दहशतवाद’ हा छुपा प्रचार
o अमेरिका, युरोपीय देशांकडून मुक्‍त बाजारपेठेची मांडणी, प्रत्‍यक्षात स्‍वतःच्‍या देशात संरक्षणाचे धोरण
o अमेरिकन अर्थव्‍यवस्‍थेतील अरिष्‍ट, युरोपमध्‍ये - ग्रीस, इटली, स्‍पेन, पोर्तुगाल इ. अर्थव्‍यवस्‍था ग‍र्तेत, ‘नफा भांडवलदारांचा, त्‍यांचा तोटा मात्र सरकारी तिजोरीतून भरणे’ हे व्‍यवहारसूत्र
o फ्रान्‍स, जर्मनी, इंग्‍लंड, अमेरिका – कामगारांचे सातत्‍याने बंद, निदर्शने, संप
o बेकारी, सामाजिक सुरक्षिततेत घट इ. मुळे वांशिक अस्‍वस्‍थता, फ्रान्‍स , इंग्‍लंड, स्‍पेन इ. ठिकाणी काळ्या, आशियाई लोकांवर वाढते हल्‍ले, नोकरीत स्‍थानिकांना, नंतर युरोपियनांना प्राधान्‍य देण्‍याचे धोरण
o जागतिकीकरणाचा फटका - अमेरिका व युरोप. चीन, भारत अर्थव्‍यवस्‍थेला वेग
o 2011 – अरब राष्‍ट्रांत स्‍थानिक हुकूमशहा व लष्‍करशहांविरोधात उठाव – पाश्‍चात्‍य राष्‍ट्रांचे तेलाचे राजकारण – जनतेची लोकशाही सत्‍तेच्‍या मागणीसाठी सातत्‍याने आंदोलने – साम्राज्‍यवाद्यांच्‍या ‘इस्‍लामिक दहशतवाद’ या सिद्धांताला छेद देणा-या सकारात्‍मक घटना

2 comments:

  1. welcome to my website for this information contact your friend and family etc. -----------
    Babk exam
    IBPS Clerk Online
    crack IBPS entrance exam

    ReplyDelete
  2. i joined this institute without any basic knowledge about the subjects and scheme of the exam. but later through the proper guidance from all the faculties, and through the systematic study plan i gained my confidence slowly .

    ReplyDelete