Wednesday, December 29, 2010

Mani Bhavan Gandhi Sangrahalaya

Mani Bhavan Gandhi Sangrahalaya

Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya “Mani Bhavan in Mumbai will ever remain a precious memory to all those who visited it on many on occasion when Gandhiji used to stay there.  I am glad therefore that it is being converted into a Gandhi memorial.” – Jawaharlal Nehru
December 28, 1931, a frustrated Gandhi returned to Mumbai after attending a Round Table Conference with the British in London.  Having discussed the discouraging situation with the Congress Working Committee, he decided to launch the Civil Disobedience Movement for Swaraj or self-rule.  The time was midnight and it was the last day of year 1931.  Early morning of January 4, 1932, Gandhiji was in his tent on the terrace of Mani Bhavan when he was arrested and jailed
Mani Bhavan has witnessed plenty of history in the making.  It was the place from where Gandhiji launched Satyagraha (the policy of non-violent resistance) against the Rowlatt Act in 1919, and the place he undertook a historic fast in 1921 to restore peace in Mumbai after disturbances broke out in wake of the Prince of Wales’ visit.  In 1930, it was from Mani Bhavan that he gave a call to the country to observe January 26 as Independence Day and to solemnly pledge to win Independence through self-sacrifice and self-suffering.
Mani Bhavan was also the place where Gandhiji learnt spinning and carding from a carder who passed by everyday.  On Kasturba’s suggestion, it was here he first took goat’s milk for his deteriorating health… Mani Bhavan was where Gandhiji lived, exchanged news and views with his colleagues, inspired his followers and won over the nation to his cherished ideals of Non-Violence and Truth.  In its sparely unadorned rooms, in his everyday belongings preserved here, it seems as if you can invoke the spirit of Gandhiji even today…
Enhanced by Zemanta

Changes in UPSC Exams (CSAT)



बुधवार, २४ नोव्हेंबर २०१०(Loksatta)
समाजात घडणाऱ्या बदलांमुळे प्रशासनासमोरची आवाहनेही बदलतात. परिणामी ही आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी आवश्यक गुण-कौशल्ये प्रशासकांना आत्मसात करावी लागतात. भारताचा विचार करता १९९१ चे उदारीकरणाचे धोरण, जागतिकीकरणाचा प्रसार, लोकशाहीकरणाची वाढती प्रक्रिया, जनमानसात निर्माण होणारी जाणीव-जागृती इ. प्रक्रियांमुळे शासन-प्रशासनासमोरील परिस्थिती बदलली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना या बदलास पचवून, त्यास यशस्वीपणे सामोरे जाता यावे या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा निर्माण करावी लागते. ही बाब लक्षात घेऊनच यूपीएससीने आपल्या परीक्षा पद्धतीत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) दरवर्षी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून भारतीय प्रशासकीय, पोलीस, परराष्ट्र, महसूल इ. विविध गट अ, गट ब सनदी सेवापदी पात्र व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीन टप्प्यांत विभागलेल्या या (यूपीएससी) परीक्षेच्या माध्यमातून पात्र उमेदवार निवडले जातात.
अर्थात, प्रशासनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळण्यास सक्षम उमेदवार हवा. या परीक्षेद्वारे ही क्षमता तपासली जाते. स्वाभाविकच या परीक्षेचा अभ्यासक्रम ही क्षमता तपासण्यासाठी पायाभूत व निर्णायक ठरतो. समाजात घडणाऱ्या बदलांमुळे प्रशासनासमोरची आवाहनेही बदलतात. परिणामी ही आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी आवश्यक गुण-कौशल्ये प्रशासकांना आत्मसात करावी लागतात. भारताचा विचार करता १९९१ चे उदारीकरणाचे धोरण, जागतिकीकरणाचा प्रसार, लोकशाहीकरणाची वाढती प्रक्रिया, जनमानसात निर्माण होणारी जाणीव-जागृती इ. प्रक्रियांमुळे शासन-प्रशासनासमोरील परिस्थिती बदलली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना या बदलास पचवून, त्यास यशस्वीपणे सामोरे जाता यावे या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा निर्माण करावी लागते. ही बाब लक्षात घेऊनच यूपीएससीने आपल्या परीक्षा पद्धतीत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

या वर्षीपासून लागू होणारा हा बदल
(१)    यापूर्वी यूपीएससी पूर्वपरीक्षेत, एक वैकल्पिक विषय व दुसरा सामान्य अध्ययनाचा असे दोन पेपर्स अंतर्भूत होते. आता त्याऐवजी एक ‘सामान्य अध्ययना’चा व दुसरा ‘नागरी सेवा कल चाचणी’ (सिव्हिल सव्‍‌र्हिसेस अ‍ॅप्टीटय़ूड टेस्ट- सीसॅट) असे दोन पेपर्स असतील. थोडक्यात वैकल्पिक विषय काढून टाकण्यात आला असून, नागरी सेवा कलचाचणी या नव्या पेपरचा समावेश केला आहे.
(२)    प्रस्तुत दोन्ही पेपर्स प्रत्येकी २०० गुणांचे असतील व त्यासाठी प्रत्येकी दोन तासांचा कालावधी निर्धारित केला आहे.
(३)    मात्र या पेपर्समध्ये एकूण किती प्रश्न असतील व त्यांची गुणविभागणी कशी असेल हे अद्यापही निर्धारित केलेले नाही.
(४)    तथापि, दोन्ही पेपर्स हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेले असतील. या प्रश्नांचे नमुने यूपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील, असे आयोगाने घोषित केले आहे.
(५)    सामान्य अध्ययनाचा पूर्वीचा पेपर कायम ठेवला असला तरी त्यात अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
(अ)    राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी; भारताचा इतिहास व भारतीय स्वातंत्र्यलढा; भारताचा व जगाचा भूगोल (प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक) आणि सामान्य विज्ञान हे पूर्वीचे अभ्यासघटक जशास तसे नमूद केले आहेत.
(ब)    मात्र पूर्वीच्या भारतीय राज्यघटनेऐवजी आता भारतीय राज्यव्यवस्था व कारभारप्रक्रिया असा उल्लेख केला आहे. यात राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायतीराज, सार्वजनिक धोरण आणि नागरिकांच्या हक्कांसंबंधी मुद्दे या घटकांचा समावेश केला आहे.
(क)    भारतीय अर्थव्यवस्था या शब्दप्रयोगाऐवजी ‘आर्थिक आणि सामाजिक विकास’ असे शीर्षक उपयोजिले आहे. ज्यात चिरंतन विकास, दारिद्रय़, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार या घटकांचा अंतर्भाव केला आहे.
(ड)    पर्यावरणीय परिस्थिती, जैवविविधता आणि हवामान बदल यासंबंधी सर्वसाधारण कळीचे मुद्दे हा घटक नव्यानेच नमूद केला आहे.
द्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी परीक्षेच्या प्रस्तुत पूर्व, मुख्य व मुलाखत या तीन टप्प्यांपैकी सद्यस्थितीत केवळ पूर्वपरीक्षेच्या संदर्भातच बदल केलेले आहेत. २०११ च्या पूर्वपरीक्षेपासून म्हणजे या वर्षीपासून लागू होणारा हा बदल पुढीलप्रमाणे लक्षात घेता येतो.
त्यामुळे सामान्य अध्ययनाची तयारी करताना जुन्याच पद्धतीचा अवलंब न करता अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या नव्या अभ्यास घटकांचा विचार करून आपल्या अभ्यास पद्धतीत बदल करणे अत्यावश्यक आहे. एनसीईआरटीची पायाभूत पुस्तके; द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस ही वर्तमानपत्रे; फ्रंटलाईन व योजना आणि भारतीय सरकारचे ‘इंडिया इयर बुक’ हे संदर्भग्रंथ, तसेच त्या त्या घटकांवरील प्रमाणित पुस्तकांचा अवलंब करून सामान्य अध्ययनाची तयारी करावी.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहता ‘नागरी सेवा कल चाचणी’चा केलेला समावेश हा संपूर्णत: नवा बदल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काहीशी भीती निर्माण झाल्याचे चित्र आहे. विशेषत: मराठी माध्यमाच्या व ग्रामीण पाश्र्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा पेपर आव्हानात्मक वाटू शकतो. तथापि या पेपरमध्ये समाविष्ट केलेल्या सर्व अभ्यास घटकांचा पद्धतशीर विचार करून ४-५ महिने दररोज तयारी केल्यास हा पेपरदेखील सुलभ बनवता येतो.
अशा सात अभ्यास घटकांचा समावेश केला आहे. अर्थात यूपीएससीने हा अभ्यासक्रम समाविष्ट करताना अंकगणितीय कौशल्ये व इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये हे घटक ‘दहावी’च्या दर्जाचे असतील हेही नमूद केले आहे. या नव्या विषयाची तयारी करताना गोंधळून न जाता विद्यार्थ्यांनी प्रत्येक अभ्यास घटकाचा अर्थ समजून घ्यावा व त्यानुसार भरपूर व नियमित सरावाद्वारे या विषयाची तयारी करावी. सर्वसाधारणत: अनेकांना असे वाटते की, एमबीएसाठी ज्या पात्रता परीक्षा घेतल्या जातात तशाच प्रकारे ही कलचाचणी अवघड असणार. त्यामुळे गणित, बुद्धिमापन चाचणी व इंग्रजीची सवय असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा विषय सुलभ ठरेल. तथापि या विषयाचे मानक ‘दहावी’च्या पातळीवरील असल्याकारणाने विद्यार्थ्यांना भीती बाळगण्याचे कारण नाही. अशी पाश्र्वभूमी नसणारा विद्यार्थी सरावाद्वारे चांगली तयारी करू शकतो.

चाचणी कल
(१)    आकलन कौशल्य (Comprehension)
(२) व्यक्ती-व्यक्तीतील संवाद, संभाषण व इतर कौशल्ये (Interpersonal Skills Including Communication Skills)
(३)    तार्किक विचार व विश्लेषणात्मक क्षमता (Logical Reasoning and Analytical Ability)
(४)    निर्णय प्रक्रिया व समस्यांची सोडवणूक (Decision Making and Problem Solving)
(५)    सामान्य बुद्धिमत्ता चाचणी (General Mental Ability)
(६)    मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण (Basic Numeracy and Data Interpretation)
(७)     इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य (English Language Comprehension Skills)

प्रस्तुत कलचाचणी विषयाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी पुढील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक, या पेपरमध्ये इंग्रजी भाषेचे आकलन या पेपरमधील आकलन कौशल्य, संभाषण-संवाद कौशल्ये, निर्णयप्रक्रिया व इंग्रजी भाषा आकलन कौशल्ये या अभ्यास घटकांच्या बाबतीत महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात इथे निबंधवजा प्रश्न नसल्याने इंग्रजी भाषेतून काहीही लिहायचे नाही, तर पेपरमधील इंग्रजी भाग वाचून त्यावरील प्रश्नांखाली दिलेल्या अचूक पर्यायाची निवड करायची आहे. त्यामुळे किमानपक्षी इंग्रजी वाचून त्यातील आशय समजण्याइतपत इंग्रजीचे ज्ञान अवगत करणे अत्यावश्यक ठरते. अर्थात यूपीएससीची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी (मराठी माध्यमातील विद्यार्थीदेखील) हिंदू, एक्स्प्रेस यांसारखी इंग्रजी वर्तमानपत्रे व फ्रंटलाईन, योजना, इंडिया इयर बुकसारखे इंग्रजीतील संदर्भ साहित्य वाचत असल्याने इंग्रजीबाबत भय बाळगण्याचे कारण नाही. मात्र आता हे संदर्भ साहित्य वाचताना इंग्रजी आकलनाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. म्हणजे योग्य शब्द, त्यांचे अर्थ, व्याकरण, त्यातील घटक याचा रीतसर अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. नियमित वाचन व भरपूर सरावाच्या माध्यमातून कोणत्याही विद्यार्थ्यांला इंग्रजी भाषेचे आकलन लागणार आहे. आकलनाबरोबरच संवादात नेमक्या सूचित बाबींचे आकलन उमेदवारात आहे की नाही, त्याचा प्रतिसाद योग्य आहे की नाही आणि त्याच्याकडे नेतृत्व गुण आहेत का, इ.ची चाचपणी केली जाणार आहे. अशा प्रकारच्या घटकांचा समावेश असणाऱ्या संदर्भ साहित्याचे भरपूर वाचन व प्रश्नांचा सराव केल्यास हे कौशल्य अवगत होईल यात शंका नाही.
तार्किक विचार व विश्लेषणात्मक क्षमतेवर आधारित प्रश्नांना अनेक विधाने दिली जातील आणि त्या विधानाशी निगडित निष्कर्ष पर्यायात अंतर्भूत केले जातील. अर्थात यासाठी विद्यार्थ्यांच्या तार्किक विचार व पृथ्थकरणाची क्षमता महत्त्वाची ठरणार आहे. भरपूर सरावाद्वारेच असे कौशल्य आत्मसात करता येईल.
‘प्रकरण अभ्यासा’च्या पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांची निर्णय व समस्यांची उकल करण्याची क्षमता तपासली जाणार आहे. विद्यार्थी एखाद्या परिस्थितीत निर्णय कसे घेतो? त्यावेळी परिस्थितीच्या सर्व बाजू लक्षात घेतो का? त्यांच्या परिणामांचा विचार करतो का? उपलब्ध पर्यायाची कशी तुलना करतो? आणि अंतिमत: समस्येची उकल अपेक्षितपणे करतो का? या बाबी तपासल्या जातील. या घटकाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे भोवतालच्या परिस्थितीचे आकलन, त्यातील बारकावे, समस्या व उपाय यासंबंधी ज्ञान निर्णायक ठरणार आहे.
वास्तविक पाहता सामान्य अध्ययनाच्या जुन्या अभ्यासक्रमात सामान्य बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अंतर्भूत होताच. मात्र अनेक विद्यार्थी या घटकाची तयारी फारच कमी करत असत. आता मात्र याची तयारी करावी लागणार आहे. संख्याश्रेणी व पायाभूत गणितीय कौशल्यावर आधारित हा घटक नियमित व भरपूर सरावाच्या माध्यमातून पद्धतशीररीत्या तयार करता येतो. त्याचप्रमाणे मूलभूत अंकगणितीय कौशल्ये व सामग्री विश्लेषणाची तयारी करताना सरावास पर्याय नाही. अंकगणितीय कौशल्यात विविध प्रकारची गणिते, त्यातील सूत्र व पद्धती यांचा सराव केल्यास हा घटक चांगल्या रीतीने तयार करता येईल. सामग्री विश्लेषणातील तक्ते, आलेख व सांख्यिकी माहिती यांचे काळजीपूर्वक व विचारपूर्वक वाचन महत्त्वाचे आहे.
शेवटी इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य आत्मसात करताना वर नमूद केल्याप्रमाणे शब्दसंग्रह; वाक्यरचना, तिचे विविध प्रकार, वाक्यात योग्य व अचूक शब्दांचा वापर, इंग्रजी व्याकरण या बाबी मध्यवर्ती असतील.
एकंदर ‘नागरी सेवा कल चाचणी’ हा विषय मुख्यत: नियमित व भरपूर सरावावर आधारित आहे हे लक्षात येते. जशी सामान्य अध्ययनात भरपूर वाचन करून त्यातील माहिती लक्षात ठेवावी लागते तशी बाब या पेपरच्या बाबतीत आढळत नाही. दुसऱ्या बाजूला किमान वेळेत प्रश्नांची उकल ही बाबही महत्त्वाची ठरणार आहे. थोडक्यात वेळेचा मुद्दा निर्णायक ठरणार आहे. सराव हेच यावरील उत्तर आहे.
एकंदर या बदलाचा स्वागतार्ह पाऊल म्हणून स्वीकार करून विद्यार्थ्यांनी त्याच्या तयारीस प्रारंभ केला पाहिजे. इंग्रजी व अंकगणितीय बाबींना न भिता नियमित व भरपूर सरावाद्वारे या पेपरसाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करता येतात यात शंका नाही. तेव्हा तुमच्या तयारीस शुभेच्छा!

UPSC Prelims 2011

UPSC Prelims 2011

यूपीएससी पूर्वपरीक्षा पेपर १ असो वा २, ते अवघड कसे हे समजायला जास्त श्रम नाहीत. आपण ज्यांच्याशी बोलतोय त्यांना यूपीएससीचा अ‍ॅप्रोच आहे किंवा नाही याची काळजी न घेता, कुणाशीही ‘अभ्यास कसा करू’ अशी चर्चा करा, यूपीएससी किती व कशी अवघड हे सोप्या भाषेत तुम्हाला सांगतील. दुर्दैवाने असेच ‘मार्गदर्शक’ आपल्या राज्यात विपुल संख्येत उपलब्ध आहेत. हो. मात्र पूर्वपरीक्षा सोपी कशी आहे हे समजून घेऊन अभ्यास करणे मात्र थोडेसे अवघड आहे. म्हणूनच महत्त्वाची ठरते नव्या पॅटर्नला, पूर्वपरीक्षा २०११ ला सामोरे जाण्यापूर्वीची रणनीती.
आयएएस/ आयपीएस/ आयएफएस/ आयआरएस/ आयआरटीएस.. अशा पदांवर पोहोचण्यासाठीच्या मार्गातले पहिले गेट म्हणजे पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा आहे. मुख्य परीक्षेत, मुलाखतीत वा अंतिम गुणतालिकेत पूर्वपरीक्षेचे गुण ‘काऊंट’ केले जात नाहीत, पण हे ‘गेट’ उघडल्याशिवाय आपण आयएएस/ आयपीएस.. चे स्वप्नही साकार करू शकत नाही. 

म्हणूनच पूर्वपरीक्षेला ‘लाईटली’ घेऊन चालत नाही आणि नव्या पॅटर्नची धास्ती घेऊनही चालणार नाही.

जुन्या पॅटर्नप्रमाणे पूर्वपरीक्षेसाठी दोन पेपर असतील. पहिला पेपर सामान्य अध्ययन (जी.एस.) आणि दुसरा पेपर सामान्य अभिरुची अर्थात अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, जी.एस. किंवा सी सॅट ही आयोगाने अधिकृतपणे घोषित केलेली पेपर्सची नावे नव्हेत; हे नामकरण आपण सर्वानी सोयीसाठी केलेले आहे. वैकल्पिक विषयाचा दुसरा पेपर रद्द करून संपूर्णत: नवीन सामान्य अभिरुचीचा पेपर आता योजिला आहे.

पूर्वपरीक्षेद्वारे ‘ज्ञान’, मुख्य परीक्षेतून ‘माहिती’ आणि मुलाखतीद्वारे व्यक्तिमत्त्व चाचणी, अभिरुचीचा कल, निर्णयक्षमता तपासली जायची. नव्या पॅटर्नमधली नवी गोष्ट ही की, उमेदवाराच्या अभिरुचीचा कल जो मुलाखतीत जोखला जायचा, आता पूर्वपरीक्षेच्या पहिल्या टप्प्यापासूनच तपासला जाईल. म्हणजे एका अर्थाने अभ्यासाची ‘लांबी आणि रुंदी’ वाढते आहे. हा बदल स्वागतार्ह आहे आणि स्वागताचा एकमेव मार्ग ‘अभ्यास’ आहे. पेपर १ व २ मधील प्रत्येक घटकावर एक स्वतंत्र लेख लिहून आपण चर्चा आणि अभ्यास करणार आहोत. या लेखात ज्या नव्या बदलांचा बाऊ केला जातोय, त्यातल्या सोप्या आणि सकारात्मक बाबींचा आपण विचार करूया.

नवा बदल आपण कसा स्वीकारतो, सामोरा जातो यातच तुमची निर्णयक्षमता, तुमच्या अभिरुचीचा कल पणाला लागेल. म्हणजे अभ्यासाच्या पहिल्या पायरीपासूनच ‘चांगला अधिकारी’ घडण्याची प्रक्रिया सुरू होईल.

पूर्वपरीक्षेचे दोन्ही पेपर्स २०० गुणांचे असतील व त्यासाठी प्रत्येकी दोन तासांचा कालावधी निर्धारित केला आहे. मात्र या पेपर्समध्ये एकूण किती प्रश्न असतील व त्यांची गुणविभागणी कशी असेल हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. जे गुलदस्त्यात आहे त्याचा विचार करून डोकं खर्ची घालण्यात कोणतं लॉजिक आहे. यापूर्वी जी.एस. १२० मिनिटांत १५० प्रश्न व वैकल्पिक विषय १२० मिनिटांत १२० प्रश्न असा पॅटर्न होता. यूपीएससी सीडीएस, एनडीच्या परीक्षा घेते. एनडीएए परीक्षेत जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट पेपर हा १५० मिनिटांसाठी असून प्रश्न असतात १५०. दुसरा गणिताचा पेपर १२० प्रश्न व वेळ १५० मिनिटे. आयोगाच्या या सवयी पाहिल्या की सर्वसाधारणपणे अंदाज बांधता येईल की पूर्वपरीक्षेच्या पेपर १ व २ ला प्रश्नांची संख्या ही कमीत कमी १२० किंवा १५० किंवा २०० असेल असे गृहित धरायला हरकत नाही. प्रश्न कितीही असोत आपल्याला सोडवायचेच आहेत, तेव्हा याचाही जास्त विचार नको. दोन्ही पेपर्स हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेले असतील, हे तर पक्के आहे. शिवाय यूपीएससीच्या वेबसाईटवर प्रश्नांचे नमुने प्रसिद्ध होणारच आहेत, तेव्हा हा मुद्दा निकाली. सर्वाधिक संभ्रम आहे तो अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टसंदर्भात. आयोगातर्फे वेबसाईटवर मॉडेल टेस्ट पेपर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबत पुरते चित्र स्पष्ट होईल. प्रसिद्ध झालेला अभ्यासक्रम पाहता काही अंदाज नक्कीच बांधता येतात. प्रश्नांचे स्वरूप ‘भयंकर’ कठीण तर नक्कीच नसेल. हा पेपर बँकिंग परीक्षा किंवा मॅनेजमेंट परीक्षा स्तराचा असेल का हे स्पष्ट होत नाही. पण प्रश्नांचा स्तर ‘इयत्ता दहावी’चा असेल हे मात्र क्लीअर आहे. इथे पण एक संभ्रम आहे, सर्वसाधारणपणे दहावीस्तरीय म्हणजे आपण समजतो, राज्य पाठय़पुस्तक मंडळाची दहावी, नव्हे! तर सीबीएसई बोर्डाची दहावी. स्टेट बोर्डाची दहावी व सीबीएसई दहावी यात ‘जमीन- आसमान’ असे अंतर आहे. इतिहास विषयाचे जी.एस.मधले काही वस्तुनिष्ठ प्रश्न ‘एम.ए. इतिहास’ विद्यार्थ्यांला घाम फोडणारे असतात हे आपण पाहतो. सोबत असाही तर्क व्यक्त होतोय की, प्रश्नांचा स्तर कॅट परीक्षेचा नक्कीच नसेल. २००९ व २०१० पूर्वपरीक्षेचे जी.एस. पेपर आवर्जून पाहा. बुद्धिमत्ता चाचणी स्वरूपात विचारले गेलेले प्रश्न हे भविष्यकाळातील अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टचे संकेत देणारे होते. साधारण तशाच स्वरूपाच्या प्रश्नांचा स्तर असेल असा होरा आहे. प्रश्नांचे स्वरूप कसेही असू द्या, तयारीसाठी उपयुक्त संदर्भसाहित्य आपल्या राज्यात येत्या काही दिवसांत उपलब्ध होईल. आयोगाच्या रणनीतीला पर्याय आहे तो आपल्या अभ्यासाचा.

पूर्वी वैकल्पिक विषय ३०० गुणांसाठी तर सामान्य अध्ययन १५० गुणांसाठी होता. उमेदवार वैकल्पिक विषयावर जास्त फोकस करायचे कारण एक प्रश्न अडीच गुणांसाठी होता तर जी.एस. एक गुणासाठी. जी.एस.मध्ये टार्गेट असायचे ५०-६० गुणांचे व बाकीची ताकद खर्ची लागायची वैकल्पिक विषयाच्या कारणी. पण आता परिस्थिती बदलली आहे. दोन्ही पेपर्स समान म्हणजे २०० गुणांसाठी असणार आहेत. सामान्य अध्ययनाचा अभ्यासक्रम पूर्वीच्या तुलनेत विस्ताराने स्पष्ट झाल्यामुळे तयारीलाही एक निश्चित चौकट मिळाली आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमात काही नवीन घटकांचा समावेश केला गेला आहे. त्याबाबतची सविस्तर चर्चा स्वतंत्र लेखात.
नव्या बदलाला सामोरे जाण्याची रणनीती म्हणजे अभ्यासाला पर्याय फक्त अभ्यासाचा. नव्या पॅटर्नचा ‘बुखार’ अजूनही उतरत नसेल तर खालील तीन बाबी वाचा व निश्चिंत व्हा.

प्रश्नांसोबत उत्तरे दिलेलीच असतात,
तुम्ही फक्त योग्य उत्तर शोधायचे.
परीक्षकाच्या मनाला इथे शून्य वाव.
बी रिलॅक्स. जुन्या पॅटर्नला पर्याय नवे पॅटर्न.
नव्या पॅटर्नला पर्याय नवी रणनीती.
पण अभ्यासाला पर्याय फक्त अभ्यासच

अभ्यासाला पर्याय फक्त अभ्यासच

सामान्य अध्ययनाच्या तयारीची रणनीती

http://www.loksatta.com/images/stories/newlok/newweekly/20101208/cr08.jpgसामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) हा अनेक अर्थाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. 


एकूण ४०० गुणांच्या पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन या घटकाला २०० गुण निर्धारित केले आहेत.


विद्यार्थी मित्रहो, आपण मागील लेखात सामान्य अध्ययन व नागरी सेवा कल चाचणीच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख करून घेतली आहे. प्रस्तुत लेखात सामान्य अध्ययन या पेपरच्या रणनीतीची सविस्तर चर्चा केलेली आहे. सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) हा अनेक अर्थाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एकूण ४०० गुणांच्या पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन या घटकाला २०० गुण निर्धारित केले आहेत. सामान्य अध्ययनातील घटकांच्या अभ्यासाची व्याप्ती, द्यावा लागणारा वेळ, उत्तरोत्तर बदलणारे स्वरूप आणि नकारात्मक गुणपद्धती इत्यादी कारणांमुळे सामान्य अध्ययनाची काळजीपूर्वक तयारी करणे गरजेचे बनले आहे. किंबहुना यावर्षीपासून अनेक कारणांमुळे सामान्य अध्ययन हा विषयच महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे या विषयावर विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने तयारीच्या प्रारंभीच पुढील तीन बाबींची पूर्तता करावी.



 १) सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म वाचन,
 २) मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, 
३) घटकवार संदर्भग्रंथाची यादी.


 ही माहिती जमा केल्यानंतर एका बाजूला ‘अभ्यास धोरण’, तर दुसऱ्या बाजूला ‘वेळेचं नियोजन’ करणे सुलभ जाते. पूर्वपरीक्षेची तयारी सुरू करताना अभ्यासक्रम पाहिल्यानंतर प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे अगत्याचे ठरते. मागील किमान १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे बारकाईने विश्लेषण करावे. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यामुळे अभ्यासाची दिशा निश्चित व स्पष्ट होते. त्यामुळे एकतर त्या त्या घटकांवरील प्रश्नांची संख्या, त्याचे स्वरूप आणि त्यात होणारे बदल लक्षात घेता येतात. अशा रीतीने या प्राथमिक बाबी हाती घेतल्यानंतर अभ्यासाचे धोरण व नियोजन आखून त्याची अंमलबजावणी सुरू करावी.


यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या तयारीसंदर्भात प्रत्येक विद्यार्थ्यांने सुरुवातीलाच पुढील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. 


एक म्हणजे यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी किमान चार महिन्यांचा कालावधी आवश्यक ठरतो. 


दुसरे म्हणजे उपलब्ध वेळेपैकी साधारणत: ६० टक्के वेळ सामान्य अध्ययनाला (म्हणजे ४० टक्के वेळ नागरी सेवा कल चाचणीस) देणे अपेक्षित आहे. सा. अध्ययनातील प्रत्येक घटकाला आपण किती वेळ देणार आहोत हेही निश्चित करणे ही तिसरी आवश्यक बाब आहे. 


चौथे म्हणजे प्रत्येक संदर्भ संपूर्ण नियोजनात तीन वेळा वाचला जाईल याची खबरदारी घ्यावी.


 पाचवे म्हणजे उजळणीचेही वेळापत्रक तयार करावे. 


सहावे म्हणजे विविध घटकांवरील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव नियोजनात अत्यावश्यक मानावा आणि शेवटी विद्यार्थ्यांने 


सामान्य अध्ययनाबाबतच्या व्यूहरचनेत आपण कोणत्या घटकास प्राथमिकता देणार आहोत, म्हणजेच प्राधान्य देणार आहोत, हे ठरविणे गरजेचे आहे. यानुसार सा.अ.तील सर्व घटकांची एक अग्रक्रमाची यादी तयार करावी.

पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे सर्वसाधारणत: तीन टप्पे पाडता येतील. प्रत्येक संदर्भग्रंथाचे किमान तीन वेळा वाचन आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन हे टप्पे केलेले आहेत. अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात त्या त्या घटकांवरील संदर्भग्रंथापैकी पायाभूत असणाऱ्या ठउएफळच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. एका अर्थाने ठउएफळ चे वाचन प्राथमिक स्वरूपाचेच आहे. विषयवार वाचन करत असताना त्यातील संकल्पना, सिद्धांत, युक्तिवाद यांच्या अचूक आकलनास अत्यंत महत्त्व आहे. कारण जी.एस.मधील बरेच घटक नवीनही असू शकतात. ज्यासंबंधी विद्यार्थी प्रथमच वाचन करीत असतो.



 त्यामुळे त्या त्या घटकांतील संकल्पना व्यवस्थित समजून घेणे महत्त्वाचे ठरते. उदा. अर्थव्यवस्थेच्या घटकात, उत्पन्नाचे प्रकार, महसुली तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय? राज्यघटनेत गणराज्य, धर्मनिरपेक्षता, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय? न्या. पुनरावलोकन व न्या. सक्रियता म्हणजे काय? इत्यादी. म्हणजे प्रत्येक विषयातील मूलभूत सिद्धांत, संकल्पना नीट लक्षात आल्यास त्याचा इतर प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे फायदा होतो. आपला संकल्पनात्मक पाया हा मजबूत असला पाहिजे याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. प्रत्येक घटकाची प्राथमिक; परंतु मूलभूत स्वरूपाची तयारी केलेली असल्यामुळे त्यावरील इतर प्रमाणित संदर्भाचे वाचन सोयीस्कर ठरते. 


उदा. आधुनिक भारताच्या इतिहासावरील NCERT वाचल्यानंतर बिपन चंद्रा यांचे Struggle for India's Independence  हे पुस्तक, भारतीय घटनेसाठी डी.डी. बसू व एम. लक्ष्मीकांत यांचे पुस्तक वाचावे. पहिल्या टप्प्यातील हे वाचन सविस्तर, सखोल असायला हवे. तसेच प्रत्येक संदर्भ वाचताना त्यातील माहितीप्रधान, आकडेवारीचा, तांत्रिक भाग कोणता हे लक्षात घेतले पाहिजे. अशा भागास अधोरेखन करून ठेवणे अथवा त्याच्या मायक्रोनोट्स काढणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पूर्वपरीक्षेसाठी नोट्स काढताना कमीतकमी व अत्यावश्यक भागाच्याच नोट्स काढाव्यात. शक्यतो संदर्भ पुस्तकात अधोरेखनाचा मार्ग अवलंबावा आणि महत्त्वाच्या बाबीच नोट्स स्वरूपात लिहून काढाव्यात. त्यासाठी ‘डायरी फॉर्म’चा स्वीकार करावा.

‘पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचा दुसरा टप्पा म्हणजे दुसरे वाचन अथवा पहिली उजळणी. दुसऱ्या वाचनात अभ्यासाच्या मजबुतीकरणास महत्त्व आहे. या पहिल्या उजळणीत त्या त्या घटकाचे आकलन अधिक बिनचूक, स्पष्ट करण्यावर भर हवा. या टप्प्यात सुरू करावयाची एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्नांचा सराव ही होय. पूर्वपरीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणे अत्यंत आवश्यक ठरते. त्यामुळे स्वत:च्या अभ्यासाची पडताळणी पाहता येते. आपल्या तयारीतील कच्चे दुवे लक्षात घेऊन त्यावर मात करता येते आणि महत्त्वाचे म्हणजे त्या त्या घटकांसंबंधी तर्कशुद्ध विचार करण्याची सवय निर्माण होते. ज्यातून Elimination  चे कौशल्य विकसित होईल.



 प्रश्नांचा सराव केल्यामुळे तयारीचा वेग व गुणवत्तादेखील वाढते. त्यामुळे प्रत्येक घटकावर किमान दीड-दोन हजार बहुपर्यायी प्रश्न सोडवले जावेत याची काळजी घ्यावी. बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करतेवेळी जागरूकतेने सोडवलेल्या प्रश्नोत्तरांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. यात आपल्याला किती प्रश्नांबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता? त्यातील किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली? किती प्रश्नांची उत्तरे चुकली व का चुकली? हा विचार करावा. तसेच काही धोका पत्करावा लागणाऱ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहेत का? नेमक्या किती प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहेत? हे सूक्ष्मपणे लक्षात घ्यावे. याद्वारेच आपला अभ्यास अधिक नेमका व अचूक करता येईल. एकंदर अभ्यास धोरणात दुसऱ्या वाचनापासून प्रश्नांच्या सरावाचा भाग उत्तरोत्तर वाढवावा.

अभ्यासाचा तिसरा टप्पा हा दुसऱ्या उजळणीचा म्हणजे तिसऱ्या वाचनाचा व अखेरचा टप्पा होय. या टप्प्यात मात्र, केवळ निवडक बाबींचे वाचन केले जावे. अत्यंत महत्त्वाचा तसेच जो माहितीप्रधान, विस्मरणात जाऊ शकतो असा भाग पुन:पुन्हा वाचणे आवश्यक ठरते. त्यामुळे विस्तृत वाचनाऐवजी एखाद्या खंडय़ा पक्ष्याप्रमाणे अत्यावश्यक तेवढाच (नेमका) महत्त्वाचा भाग वाचावा. महत्त्वाचे म्हणजे प्रश्नांचा सराव अधिकाधिक करावा. अभ्यासाच्या वेळेपैकी ५० टक्के वेळ प्रश्नांच्या सरावासाठी दिला तरी काही हरकत नसावी.


प्रस्तुत अभ्यासाच्या वेळेचे नियोजन करताना उपलब्ध वेळेचे दीर्घकालीन व दैनंदिन नियोजन असे वर्गीकरण करावे. दीर्घकालीन नियोजनात तीन टप्पे पाडावेत व अभ्यासाच्या आशय व स्वरूपानुसार त्यात विशिष्ट वेळ समाविष्ट करावा.



 यानुसार पहिल्या टप्प्यात/ वाचनास जास्त वेळ लागणे स्वाभाविक आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेतील साधारणत: अर्धा वेळ म्हणजे दोन महिने या पहिल्या वाचनास द्यावेत. त्यानंतर उरलेल्या वेळेपैकी दीड महिना दुसऱ्या वाचनास व उर्वरित वेळ तिसऱ्या वाचनास द्यावा. दुसऱ्या बाजूला वेळेचे दैनंदिन नियोजन करताना दररोज


 १) सामान्य अध्ययनातील एक अभ्यासघटक (सुमारे ५ तास), 
२) वर्तमानपत्रे (२ ते २.५ तास) आणि 
३) नागरी कल चाचणीतील एखादा घटक (३ ते ३.५ तास) अशी विभागणी करावी. यासंदर्भात एक महत्त्वाची बाब म्हणजे फ्रंटलाइन, योजना, क्रोनिकल, इंडिया इयर बुक व आर्थिक पाहणी अहवाल यासारख्या संदर्भसाहित्यासाठी आठवडय़ातील दीड ते दोन दिवस राखीव ठेवावा. त्यामुळे समांतरपणे या संदर्भग्रंथाची तयारी सुरू राहिल्याने अभ्यासाचे ओझे आपोआपच कमी होत जाईल.

वेळेच्या नियोजनासंदर्भात आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे प्रत्येक अभ्यास घटकास द्यावयाचा कालावधी होय. त्या त्या घटकासाठी पाहावयाची संदर्भ यादी आणि स्वत:ची पाश्र्वभूमी व त्यासंबंधीची तयारी लक्षात घेऊन प्रत्येक घटकासाठी कालावधी निर्धारित करावा आणि त्या वेळेत तो घटक तयार करावा.


अभ्यास व वेळेच्या नियोजनासंदर्भात चौकट ठरवली असली तरी त्यात एक लवचिकता राहील याची काळजी घ्यावी आणि महत्त्वाचे म्हणजे नियोजनाची सातत्याने अंमलबजावणी झाली पाहिजे यावर आपला कटाक्ष हवा. अन्यथा कागदी नियोजन व्यर्थच आहे हे सांगणे नको! त्यामुळे ठरवलेल्या वेळात निर्धारित बाबी वाचून होत आहेत का? त्यात काय अडचणी येत आहेत? हे लक्षात यावे यासाठी नियोजनाचे सातत्याने पुनरावलोकन गरजेचे ठरते.


यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या बदललेल्या स्वरूपात सामान्य अध्ययन हा विषय मध्यवर्ती ठरणार आहे. हे लक्षात घेऊनच यावर भर देणे महत्त्वाचे आहे हे प्रारंभीच म्हटले आहे. कारण सामान्य अध्ययन व नागरी सेवा कल चाचणी या दोन पेपर्सचा विचार करता हे लक्षात घ्यावे लागते की, नागरी सेवा कल चाचणी पेपर तयार करताना सर्वच विद्यार्थ्यांचा (ग्रामीण, निमशहरी, प्रादेशिक भाषेतून शिक्षण झालेल्या) विचार केला जाईल. मात्र सामान्य अध्ययनाच्या बाबतीत सर्व विद्यार्थी बऱ्याच प्रमाणात एकाच पातळीवर असल्याने हा पेपरच अधिकाधिक आव्हानात्मक केला जाईल. म्हणूनच विद्यार्थ्यांनी यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय कल चाचणीच्या बाबतीत गणित, बुद्धिमापन चाचणीतील काही सूत्रे व पद्धती आणि इंग्रजीच्या संदर्भातील काही व्याकरणासंबंधी बाबी वगळल्यास सामान्य अध्ययनाप्रमाणे माहिती, आकडेवारी अथवा संकल्पना-सिद्धांत अनेकदा वाचून लक्षात ठेवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. कल चाचणीच्या बाबतीत नियमित सराव हाच घटक कळीचा ठरणार आहे. त्यामुळे सामान्य अध्ययन हाच पूर्वपरीक्षेत निर्णायक ठरण्याची अधिक शक्यता आहे. याचा अर्थ कलचाचणी महत्त्वाची नाही असे नाही किंवा त्यास फारच कमी वेळ द्यावा असे नाही. त्याची योग्य ती तयारी करावी लागणारच आहे. ज्याविषयी पुढील लेखात सविस्तरपणे चर्चा केली जाणार आहे. 


एकंदर सामान्य अध्ययनाचा बदलता अभ्यासक्रम व बदलत्या स्वरूपाचे योग्य आकलन : त्यासाठी दर्जेदार संदर्भग्रंथाची निवड : प्रत्येक घटकावरील संदर्भ साहित्याचे किमान तीन वेळा वाचन : बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव या अभ्यासपद्धतीचा अवलंब केल्यास सामान्य अध्ययनाचे शिखर यशस्वीरीत्या गाठता येईल यात शंका नाही.



Source-- Loksatta

भूगोल, पर्यावरणीय मुद्दे आणि इतिहासाचा चक्रव्यूह भेदताना







विद्यार्थीमित्रहो, आज आपण ‘भारताचा व जगाचा भूगोल’ (प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक), ‘पर्यावरणीय पारिस्थितीकी आणि हवामान बदल’ यासंबंधी मुद्दे आणि ‘भारताचा इतिहास व स्वातंत्र्यलढा’ या बदललेल्या सामान्य अध्ययनातील तीन अभ्यासघटकांच्या अभ्यासाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. वास्तविक पाहता ‘भारताचा व जगाचा भूगोल’ आणि ‘पर्यावरण पारिस्थितीकी आणि हवामान बदल’ हे दोन भिन्न घटक म्हणून सामान्य अध्ययनात समाविष्ट केले असले तरी त्यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे किंबहना ते परस्परव्याप्त आहेत हे लक्षात घ्यावे. तथापि ‘पर्यावरण’ हा घटक एकंदर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यवस्था व सार्वजनिक धोरणनिर्मितीतील महत्त्वाचा घटक बनल्यामुळे त्यासंबंधी कळीचे मुद्दे जाणीवपूर्वक यूपीएससी पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये स्वतंत्र घटक म्हणून समाविष्ट केले आहेत.

गेल्या १० वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की, सामान्य अध्ययनात, चालू घडामोडींच्या घटकानंतर महत्त्वपूर्ण असणारा घटक म्हणजे भूगोल. या विश्लेषणावर आधारित आकडेवारी (जुन्या पद्धतीनुरूप) पुढील तक्त्यात दिली आहे. या घटकाची तयारी अर्थात त्याचा अभ्यासक्रम पाहनच करायची आहे. ढोबळमानाने भूगोलाच्या घटकात सामान्य भूगोल, जगाचा भूगोल व भारताचा भूगोल अशी विभागणी करता येते. समान्य भूगोलात विश्वाची रचना, सूर्यमंडल, पृथ्वी, इतर गृह व त्यांचे उपग्रह इ. चा समावेश होतो. प्राकृतिक, आर्थिक व मानवी अशी जगाच्या भूगोलाची व्याप्ती दिसून येते. भारताच्या भूगोलाबाबतही प्राकृतिक, आर्थिक, राजकीय व मानवी भूगोल असे उपघटक दिसून येतात.
भूगोलाच्या अभ्यासक्रमाचे अवलोकन केल्यानंतर यावर विचारलेल्या मागील प्रश्नांच्या स्वरूपाकडे लक्ष द्यायचे आहे. पुढील तक्त्यात दिल्याप्रमाणे भूगोलाच्या उपरोक्त अभ्यासक्रमावर आधारित २५ ते ३० प्रश्न पूर्वपरीक्षेत विचारलेले दिसून येतात.

प्रश्नप्रत्रिकातील या प्रश्नांचे वाचन केल्यास असे लक्षात येईल की हे प्रश्न साधारणत:
(१) थेट, सरळ व माहिती प्रधान 
(२) आकडेवारी विचारणारे 
(३) नकाशावर आधारित आणि 
(४) संकल्पनात्मक प्रश्न, 

अशा प्रकारे वर्गीकृत करता येतात. उदाहरणार्थ २०१० मध्ये ‘ग्रीनडेक्स २००९ स्कोअर’ काय आहे? हा प्रश्न विचारला होता. किंवा २००९ मध्ये विचारलेला ‘कोणत्या उपग्रहास सर्वाधिक नैसर्गिक उपग्रह आहेत? हा प्रश्न माहितीप्रधान सरळ स्वरूपाचा आहे. खनिजे, ऊर्जा संसाधने व विविध औद्योगिक उत्पादनाशी संबंधित आर्थिक भूगोलावर आधारित प्रश्नात आकडेवारी विचारली जाते. उदा. २०१० मध्ये खालीलपैकी कोणत्या पिकाखालील क्षेत्र गेल्या दशकात बहतांश कायम राहिले आहे? हा प्रश्न किंवा २००८ मध्ये ‘खालीलपैकी कोणत्या शहरांची लोकसंख्या दहा लक्षापेक्षा अधिक आहे?’ अथवा ‘भारताच्या एकूण लोकसंख्येत ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांचे प्रमाण किती?’ हा प्रश्न आकडेवारीवर आधारित आहे. २०१० च्या प्रश्नपत्रिकेत मल्लाकातून प्रवास करताना कोणते शहर आढळते? हा प्रश्न किंवा २००८ मध्ये ‘खालीलपैकी कोणते शहर विषुववृत्ताच्या नजीक आहे?’ हा प्रश्न अथवा ‘खालीलपैकी कोणकोणत्या देशांच्या सीमा मोल्दोवा या देशाशी सामाईक आहेत? हा प्रश्न नकाशाधारित आहे. या प्रश्नांच्या प्रकारात सामाईक सीमा (देश, शहरे), नद्या व देश, नद्याकाठची शहरे, प्रकल्पाचे ठिकाण वारंवार विचारले जाते.

अ‍ॅसर्शन व रीझिनगचे प्रश्न हे संकल्पनात्मक प्रश्न असतात. प्राकृतिक रचनेची वैशिष्टय़े, हवामान प्रकार इ.शी संबंधित प्रश्न संकल्पनात्मक स्वरूपाचे असतात. 
उदा.२०१० च्या प्रश्नपत्रिकेत ‘भारतात काही भागात लालमृदा आढळते त्याचे काय कारण आहे?’ अथवा ‘किंग कोब्रा हा एकमेव साप आपले घरटे का बनवतो?’ हे प्रश्न संकल्पनात्मक व भूगोलातील तर्कावर आधारित आहेत.

प्रश्नांच्या या विश्लेषण- वर्गीकरणातूनच आपली अभ्यासाची पद्धती ठरवावी. म्हणजे काही विशिष्ट स्वरूपाचे प्रश्न वारंवार  विचारले जातात. उदा. नद्या व त्यावरील शहरे, प्रकल्प व देश, नद्या व प्रकल्प, जमाती व देश-प्रदेश, पर्वत-शिखरे-गवताळ प्रदेश, पर्जन्यमान व उत्पादने, जनगणना इ. घटकांवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. म्हणून याची सर्वागीण तयारी करावी. भूगोलाची तयारी करतांना आरंभापासून ते परीक्षेला जाईपर्यंत सतत करावयाची गोष्ट म्हणजे नकाशावाचन. प्रत्येकाने ‘टीटीके’ किंवा ‘ऑक्सफ़र्ड’चे नकाशा पुस्तक कायम आपल्याजवळ बाळगावे आणि प्रत्येक घटकाचे वाचन करतांना नकाशा समोर ठेवावा.
त्याचबरोबर कोरे अथवा रिकामे नकाशे वापरून विविध बाबींच्या स्थानांचा सरावही करावा. नकाशाद्वारे भूगोलाचा अभ्यास दृश्यात्मक व रसपूर्ण करता येतो. या संदर्भात लक्षात ठेवायची आणखी एक गोष्ट म्हणजे जनगणनेवर आधारित लोकसंख्येची वैशिष्टय़े विचारणारे अनेक प्रश्न आढळून येतात. साक्षरता-निरक्षरता, ग्रामीण-शहरी प्रमाण, स्त्री-पुरुष प्रमाण, दारिद्रय़रेषेखालील प्रमाण, नागरीकरणाचे प्रमाण, विविध आदिवासी जमातींचे प्रमाण, ज्येष्ठांचे प्रमाण, क्रियाशील लोकांचे प्रमाण, बालमृत्युदर, दरडोई उत्पन्न, महत्त्वाच्या रोगांनी बाधित लोकांचे प्रमाण इ. महत्त्वाच्या लोकसंख्यात्मक गुणवैशिष्टय़ांची सविस्तर तयारी केली पाहिजे.
भूगोलाच्या तयारीतील आणखी एक मध्यवर्ती बाब म्हणजे विविध घटकांवर विचारलेले प्रश्न हे त्या त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडींचा संदर्भ असणारे दिसून येतात. म्हणजे सोप्या भाषेत भूगोलाशी संबंधित चालू घडामोडींची व्यवस्थितपणे तयारी करणे अत्यावश्यक ठरते.

उदा. २०१० मध्ये ‘मॉन ८६३’ ही मक्याची जात चर्चेत का होती?’

हा प्रश्न अथवा एलटीटीई विरोधी कारवायामुळे श्रीलंका चर्चेत असल्याने ‘एलिफ़न्टा पास’विषयी २००९ च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला.

निकोबार बेटावरील शोम्पेन जमात चर्चेत असल्याने त्यावर प्रश्न विचारला गेला.

त्यामुळे भूगोलाच्या व्याप्तीत येणाऱ्या सर्व चालूघडामोडींची व्यवस्थितपणे तयारी करणे अत्यावश्यक ठरते.

त्या दृष्टीने गेल्या वर्षभरातील चर्चेतील ठिकाणे, प्रकल्प, विविध परिषदांची ठिकाणे, त्या परिषदांचे फ़लित, लोकसंख्या व खनिजे, ऊर्जा व उत्पादनाचे कल, हवामान बदलाशी संबंधित बाबी, मान्सूनविषयक तपशील, अवकाश मोहिमा, नैसर्गिक आपत्ती इ. ची तयारी मूलभूत ठरेल. ही तयारी करताना चर्चेतील मुद्दय़ांशी संबंधित सर्वागीण माहिती जमा करावी.

अर्थात ही सर्व तयारी करण्यासाठी दर्जेदार, प्रमाणित व अद्ययावत संदर्भग्रंथाची यादी अटळ ठरते. त्या दृष्टीने ६ वी ते १२ वीची उएठढ ची पुस्तके (त्यात ८ ते १२ वीच्या पुस्तकांवर विशेष भर द्यावा) पायाभूत ठरतात. म्हणूनच विदय़ार्थ्यांनी यावर प्रभुत्व प्रस्थापित केले पाहिजे.

त्याचबरोबर जी.सी. लिआँग यांचे प्राकृतिक भूगोलावरील पुस्तक एक प्रकारचा गुरूग्रंथच आहे. जनगणना, उत्पादनांचे कल यासाठी ‘इंडिया इयर बुक २०११’ व फेब्रुवारीत प्रकाशित होणारा ‘आर्थिक पाहणी अहवाल’ पाहावा. 

याच्या जोडीला टीटीके अथवा ऑक्सफ़र्डचे नकाशापुस्तक घ्यावे. िहदू, फ्रंटलाईन, योजना, क्रोनिकल व विझार्डमधून भूगोलाशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करावी.

‘पर्यावरणसंबंधी कळीच्या मुद्दय़ां’ची तयारी करताना पर्यावरण, त्यातील घटक, त्यांचे स्वरूप व वैशिष्टय़े यांचा अभ्यास प्रथम करावा. त्यानंतर त्याविषयक समस्या, त्यांचे स्वरूप, कारणे व परिणाम यावर लक्ष द्यावे. उदा. जागतिक तापमानवाढ म्हणजे काय? तिची नेमकी कोणती कारणे आहेत आणि परिणाम काय आहेत याचा सविस्तर अभ्यास करावा. महत्त्वाचे म्हणजे या समस्यांवर उपाय योजन्यांसाठी स्थानिक, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर झालेल्या प्रयत्नंची पूर्ण माहिती जमा करावी. यात विविध परिषदा, बैठका, त्यातील चर्चा, करारनामे, निर्माण केलेल्या यंत्रणा, त्यासंबंधी विविध देशांच्या भूमिका, त्यातील मतभिन्नता, त्याची कारणे इ.संबंधी माहिती तक्त्याच्या स्वरूपात तयारी करावी. त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रीय शासनाने पर्यावरणासंबंधी केलेली धोरणे, कार्यक्रम, घेतलेले पुढाकार, या संदर्भात कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती व संस्था, त्यासाठी त्यांनी केलेले संशोधन, त्यासाठी मिळालेली पारितोषिके इ.ची माहिती संकलित करावी. पर्यावरणीय कारणांमुळे चर्चेत असलेल्या प्रकल्पाचीही तयारी करणे गरजेचे आहे. उदा. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प. हा भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून महाराष्ट्रात उभारला जात आहे. थोडक्यात, पर्यावरणीय मुद्दय़ांसंबंधी एका बाजूला ऐतिहासिक पाश्र्वभूमी व दसऱ्या बाजूला त्यासंबंधी चालू स्थितीविषयक माहिती संकलित करावी. 

‘भारताचा इतिहास व स्वातंत्र्यलढा’ या घटकात रूढार्थाने प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारत अशी विभागणी दिसून येते.

गेल्या काही वर्षांपासून प्राचीन व मध्ययुगीन इतिहासावर ६ ते ७ प्रश्नच विचारले जातात. भारताच्या स्वातंत्र्यलढय़ावरच मुख्य भर दिलेला दिसून येतो, ज्यावर १०-१५ प्रश्न (जुन्या पद्धतीत) विचारले जात असत.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतिहासाची तयारी करताना प्राचीन व मध्ययुगीन इतिहासास पर्याप्त वेळ देऊन आधुनिक इतिहासासाठी अधिक वेळ देणे गरजेचे ठरते.

इतिहासाची तयारी करताना विद्यार्थी सनावळ्यातच गुरफ़टून जातो. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास कंटाळवाणा वाटतो. तथापि इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या नव्हे. कोणताही कालखंड असला तरी त्यात येणाऱ्या विविध ऐतिहासिक टप्प्यांचे सूत्रबद्ध वर्गीकरण केलेले असते. त्याचा कालखंड लक्षात घेऊन त्यासंबंधी ऐतिहासिक वास्तू व ठिकाणे, सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय व आर्थिक परिस्थिती लक्षात घ्यावी. थोडक्यात, प्रत्येक कालखंडाची त्याच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक वैशिष्टय़ांसह तयारी केल्यास ऐतिहासिक कालखंड, त्यातील टप्पे, त्यातील संक्रमण, संबंधित अनेक व्यक्ती, घटना व ठिकाणांची माहिती लक्षात घेणे व ती स्मरणात ठेवणे सुलभ जाते. त्यामुळे इतिहासाची तयारी करताना थोडा व्यापक विचार करावा. दसरे म्हणजे राजेरजवाडे, त्यांच्या कार्याविषयी आपापल्या सोईनुसार काही सांकेतिक शब्द तयार करून पाठांतराचे एक स्वत:चे तंत्र विकसित करता येते. म्हणजे ३ प्रत्येकाच्या नावातील आद्याक्षर, त्यांचा क्रम, त्यांनी निर्माण केलेल्या बाबींशी जोडल्यास काहीएक शब्द तयार होऊ शकतो. अर्थात अभ्यासाची सुरुवात केल्यावरच हे तंत्र अवगत करता येते. या संदर्भात ‘डायरीचा फ़ॉर्म’ महत्त्वाचा मानावा. स्वातंत्र्यलढय़ाची तयारी करताना ब्रिटिश शासनव्यवस्था; प्रत्येक व्हाइसरॉयचा कालखंड, त्यांनी केलेले विविध कायदे, राबवलेली धोरणे; समाज-धर्मसुधारणा चळवळ, व्यक्ती व संघटना; राष्ट्रवादाचे टप्पे, राष्ट्रीय काँग्रेसचा प्रवाह; आदिवासी-शेतकरी, क्रांतिकारक, स्त्रिया यांच्या चळवळी; आधुनिक भारताचे प्रमुख इतिहासकार, अभ्यासक व विश्लेषक, त्यांचे ग्रंथ, त्यांची मते अशा प्रमुख विषयांना केंद्र मानून तयारी करावी. इतिहासाच्या संदर्भाबाबत प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतावरील उएठढ ची पुस्तके पायाभूत मानावीत. 

याखेरीज स्वातंत्र्यलढय़ासाठी बिपन चंद्रा यांचे ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’ आणि ग्रोवर आणि ग्रोवर यांचे आधुनिक भारतावरील पुस्तक सविस्तरपणे वाचावे.  

तिन्ही घटकांना पुरेसा वेळ, संदर्भित पुस्तकांचे तीन वेळा वाचन, उजळणीचे वेळापत्रक आणि यावरील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव केल्यास सामान्य अध्ययनात निर्णायक ठरणाऱ्या या घटकांची चांगली तयारी करता येईल.

Wednesday, December 8, 2010

GK Dose (MPSC)


१)    ग्रामीण भागात स्वयंपाकाचा गॅस (LPG) च्या उपयोगात वाढ होण्यासाठी केंद्र सरकारने कोणती वितरण योजना तयार केली आहे?
- राजीव गांधी ग्रामीण एलपीजी वितरण योजना
२)    संयुक्त राष्ट्र संघाच्या कृषी व खाद्य विभागाच्या रिपोर्टनुसार भारत किती कृषी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?
- २५
३)    शासनाने सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना मजुरी  ६६ रु. ऐवजी किती किमान रु. मजुरी दिली जाणार आहे?
- १०० रु.
४) केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे?
- राळेगणसिद्धी
५)    ४७ वे राज्य चित्रपट पुरस्कार- २०१० मधील राज कपूर स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
- मनोजकुमार
६)    बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत?
- शेख मुजीब-उर-रहमान
७)    २०१६ चे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले?
- ब्राझील
८)    जागतिक आले उत्पादनात भारताने डिसेंबर २०१० मध्ये कितवा क्रमांक मिळविला आहे?
- प्रथम
९) राज्य शासनाकडून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी दिला जाणारा ‘वनश्री पुरस्कार’ हा २०१० चा कोणाला देण्यात आला?
- आर्यन फाऊंडेशन
१०) ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदावर प्रथमच महिला राष्ट्रपती दिलमा रोऊसेफ यांची निवड झाली. ते त्या कोणत्या पक्षाच्या उमेदवार आहेत?
- वर्कर्स पार्टी
११) केंद्र सरकारने कोणत्या प्राण्यास ऑक्टोबर २०१० मध्ये राष्ट्रीय विरासत म्हणून घोषित केले आहे?
- हत्ती
१२) फोर्ब्सच्या भारतातील प्रमुख ग्रामीण उद्योजकांच्या यादीत किती ग्रामीण शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे?
- सात
१३) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढावा यासाठी राज्यात कोणत्या प्रणालीचा उपयोग २०११-१२ मध्ये करण्यात येणार आहे?
- ई-व्होटिंग
१४) जागतिक पहिला विश्व सांख्यिकी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला?
- २० ऑक्टोबर
१५) भारत-ब्रिटन यांचा संयुक्त वायुसैनिकी अभ्यास प. बंगाल येथे पार पडला. या अभ्यास मोहिमेला काय नाव देण्यात आले?
- इंद्रधनुष्य
१६) सन २०१० चा अनंत भालेराव पुरस्कार कोणाला देण्यात आला?
- ना. धों. महानोर
१७) फॅशन जगतामध्ये अभूतपूर्व योगदान दिल्याबद्दल फ्रान्सचा प्रतिष्ठित नागरी सम्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला?
- रितु बेरी (भारत)
१८) भारत सरकारने अपंगांसाठी विमा योजना चालू केली आहे या योजनेला देण्यात आलेले नाव
- निर्भय योजना
१९) जानेवारी २०११ मध्ये होणाऱ्या जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
- डॉ. विजय भटकर
२०) चीन येथे २०१० मध्ये पार पडलेल्या १६ व्या आशियाई स्पर्धेचे शुभंकर काय ठरविण्यात आले आहे?
- पाच बकरींचा समूह
२१) संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या परिषदेवर भारताची दोन वर्षांकरिता निवड झाली आहे? (अस्थायी स्वरूपात)
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद
२२) भारत-जर्मनी यांच्या मैत्रिचे प्रतीक म्हणून २०१२-१३ हे जर्मनीमध्ये काय म्हणून साजरे करणार आहे?
- भारत वर्ष
२३) परदेशात गांधीवादी तत्त्वे व मूल्ये यांचा प्रसार करण्यासाठी देण्यात येणारा जमनालाल बजाज पुरस्कार कोणाला देण्यात आला?
- लिया दिस्किन (ब्राझील)
२४) पाणी हे जीवन आहे सांगून संयुक्त राष्ट्र संघाने २००५-२०१५ हे दशक काय म्हणून घोषित केले आहे?
- पाणी दशक वर्ष
२५) राष्ट्रकुल स्पर्धेमधील सर्वश्रेष्ठ खेळाडूचा ‘डिक्सन पुरस्कार’ हा कोणाला प्रदान करण्यात आला?
- ट्रेसिया स्मिथ (जमैका)
२६) भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने कोणत्या रकमेच्या नोटा हे प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवले आहे?
- १० रु.
२७) गोवा येथे पार पडलेल्या ४१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या मराठी चित्रपटाने स्थान मिळविले?
- विहीर
२८) सन २०१० चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला?
- लुईस इनासिओ तुलाडासिल्वा
२९) वैश्विक पवन ऊर्जा परिषदेच्या आकडेवारीनुसार पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?
- पाचवा
३०) विदर्भातील तीन व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाचे मूल्यमापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष
- डॉ. पी. सी. कोतवाल
३१) महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे १७ वे अधिवेशन उद्घाटक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
- डॉ. जब्बार पटेल
३२) पुलोत्सव कृतज्ञता सम्मान हा पुरस्कार कोणत्या सामाजिक कार्यकर्त्यांस जाहीर झाला आहे?
- सिंधुताई सकपाळ
३३) भारताने शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी एप्रिल २०१० रोजी कोणत्या देशाबरोबर करार केला?
- ऑस्ट्रेलिया
३४) मुंबईच्या फाळके अकादमीतर्फे देण्यात येणारा फाळके रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला?
देव आनंद
३५) देशातील पहिले होमिओपॅथिक विश्वविद्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे?
- राजस्थान
३६) देशातील पहिले गृहनिर्माण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
- महाराष्ट्र
३७) बाराव्या ‘मामी’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटास सवरेत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात आला?
- मेजॉरिटी
३८) सन २०१० चा बुकर पुरस्कार हा कोणत्या लेखकास देण्यात आला?
- हॉर्वर्ड जेकबसन
३९) भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे?
- हडपसर (पुणे)
४०) देशातील पहिले होमिओपॅथिक विश्वविद्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे?
- राजस्थान
४१) जागतिक आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण दिवस कोणता आहे?
- २१ ऑक्टोबर
४२) सवाई गंधर्व महोत्सव पुण्याऐवजी या वर्षी कोठे पार पाडण्यात आला?
- मुंबई
४३) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ‘ना उद्योग जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आला आहे?
- रायगड
४४) १७ सप्टेंबर २०१० मध्ये कोणत्या दोन देशांदरम्यान गोलमेज संमेलन संपन्न झाले?
- भारत-कॅनडा
४५) अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे देण्यात येणारा ‘जीवन गौरव पुरस्कार’ कोणाला देण्यात आला?
- शं. ना. नवरे आणि मंगला संझगिरी
४६) एन.डी.टी.व्ही. प्रॉफिट अ‍ॅवॉर्डतर्फे देण्यात येणारा ‘क्रिएटिव्ह एन्टरटेन्मेंट ऑफ द इयर’चा पुरस्कार हा कोणाला मिळाला?
- आमिर खान
४७) १६ वे नवोदित मराठी साहित्य संमेलन कोठे भरविण्यात आले होते?
- संगमनेर
४८) ‘राजीव गांधी कला पुरस्कार’ हा कोणाला देण्यात आला?
- सचिन खेडेकर
४९) अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा ‘संत तुकाराम साहित्य गौरव पुरस्कार’ कोणाला देण्यात आला?
- कवी आकाश सोनवणे
५०) स्पेनला भेट देणारी पहिली भारतीय राष्ट्रपती?
- प्रतिभाताई पाटील
५१) उत्तराखंड राज्याने गंगा नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी कोणत्या अभियानाची सुरुवात केली आहे?
- स्पर्श गंगा अभियान
५२) बहुप्रत्यक्षित मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सुविधा सर्वप्रथम कोणत्या राज्यात राबविली जाणार आहे?
- हरयाणा
५३) केंद्र सरकारने २२ जून २००९ मध्ये कोणत्या पार्टीला ‘उग्रवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे?
- भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)
५४) देशात प्रतिबंधित करण्यात आलेली भारतीय कम्युनिस्ट पार्टी ही कितवी प्रतिबंधित पार्टी आहे?
- ३५ वी.
५५) कोणता राष्ट्रीय पक्ष २०१० हे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे?
- बहुजन समाज पक्ष
५६) PCLV-C-14  द्वारा किती विदेशी नॅनो सॅटेलाइट अवकाशात पाठविण्यात आले?
- सहा
५७) महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे झपाटय़ाने निकाली काढण्यासाठी किती विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे?
- १२
५८) भारताचा ४० व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
- I can't live without you
५९) देशातील महिला साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन हाती घेतले आहे?
- साक्षर भारत मिशन
६०) कोणत्या दोन राज्यांमध्ये सन २०१० मध्ये पंचायत राजमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू करणार आहे?
- राजस्थान व केरळ
६१) जैन बंधू प्रभावती पत्रकारिता पुरस्कार २०१० कोणाला जाहीर करण्यात आला?
- उत्तम कांबळे
६२) किसन गंगा प्रकल्प कोणत्या राज्यात साकारला जात आहे?
- जम्मू-काश्मीर
६३) ६-१४ वयोगटातील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या नियमात केंद्र-राज्य यांचा खर्चाचा हिस्सा कसा असेल?
- ६५:३५
६४) विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
- राजाभाऊ शिरगुप्पे
६५) हैदराबाद येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बाल फिल्मोत्सवाला काय नाव देण्यात आले आहे?
- ग्लोबल एलिफंट महोत्सव
६६)    वेलु पिल्लई प्रभाकरनचा मृत्यू झाल्यानंतर लिट्टेचा कार्यकारभार कोणी सांभाळला?
- सेलेवसा पद्मनाथन
६७) नेपाळच्या नवीन पंतप्रधानपदी यांची निवड करण्यात आली.
- माधव कुमार नेपाळ
६८) देशात कोणत्या राज्याने आर्थिक गुंतवणुकीत प्रथम क्रमांक पटकावला?
- महाराष्ट्र
६९) सन २०१३ मध्ये कुंभमेळाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
- अलाहाबाद
७१) महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस ‘सद्भावना दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो?
- २० ऑगस्ट
७१) इंटरनेटवरील अश्लील साइट्सला बंदी घालणारी चीनमधील योजना कोणती?
- ग्रीन डॅम
७२) ग्रामीण विकास मंत्रालयाने सुवर्णजयंती ग्रामविकास योजनेस दिलेले नवीन नाव कोणते?
- राष्ट्रीय आजिविका मिशन
७३) आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या वतीने ‘हॉल ऑफ फेम’मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूची निवड करण्यात आली?
- कपिल देव
७४) सप्टें. २००९ मध्ये इंटरनेट सुविधाला किती वर्षे पूर्ण झाली?
- ४० वर्षे
७५) चिनी नागरिकांच्या मते सर्वात प्रभावशाली परदेशी नेत्यांमध्ये समाविष्ट असलेले दोन भारतीय नेते कोण आहेत?
- रवींद्रनाथ टागोर व पं. जवाहरलाल नेहरू
७६) आरोग्य सेवा मिळविणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे असे विधेयक मांडणारे राज्य कोणते?
- आसाम
७७) राष्ट्र मंडलाच्या शिखर संमेलनामध्ये कोणत्या देशाला समावेश हा राष्ट्र मंडल सदस्य म्हणून घेण्यात आले?
- रवांडा
७८) युरोपियन संघच्या सोबत कोणत्या देशाची पहिली शिखर परिषद संपन्न झाली?
- पाकिस्तान
७९) युरो (एवफड) या चलनाचा वापर करणाऱ्या देशांची संख्या किती आहे?
- १५ देश
८०) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (EURO) सर्वाधिक रऊफ असणारा देश कोणता?
- अमेरिका
८१) न्यू जर्सी येथील पहिले विश्व मराठी नाटय़ संमेलन- २०१० चे अध्यक्ष कोण आहेत?
- रामदास कामत
८२) हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा- २०१४ कोठे भरविण्यात येणार आहे?
- सोची (रशिया)
८३) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य पाच देश कोणते?
- अमेरिका, रूस, फ्रान्स, ब्रिटेन, चीन
८४) भारतातील पहिले हरित शहर म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली?
- आगरतळा
८५) साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार- २००८ चे मानकरी कोण आहेत?
- अख्तर खान शहरयार
८६) पंचायत राज यशस्वी पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या दोन राज्यांना देण्यात आला?
- केरळ व कर्नाटक
८७) सन २०१० मध्ये महिला वर्ल्ड कप टी-२० मध्ये सर्वात जलद शतक कोणत्या खेळाडूने पूर्ण केले?
- लिझा स्थालेकर (ऑस्ट्रेलिया)
८८) सन २०१० चा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार हा कोणाला जाहीर करण्यात आला?
- जगन्नाथ महाराज पवार
८९) लव इन रिलेशनशिपअंतर्गत सोबत राहणाऱ्या दाम्पत्यातील जोडीदारांनी किती निकष पूर्ण केले असतील तर महिलेस पोटगी मिळेल?
- चार निकष
९०) भारतातील कोणत्या राज्याने मतदान करणे अनिवार्य आहे असे घोषित केले आहे?
- गुजरात
९१) १६ वर्षांखालील मुलांना मोबाईल फोन विकणे, तसेच शाळा व कॉलेजमध्ये मोबाईल वापरावर कोणत्या राज्याने बंदी घातली आहे?
- कर्नाटक
९२) लिबेरा पीपल्स चॉइसचा आशियाई पुरस्कार हा २०१० चा कोणाला देण्यात आला?
- सचिन तेंडुलकर
९३) भारतीय योजना आयोगाच्या ‘भारत दृष्टी २०२०’ चा मुख्य उद्देश काय आहे?
- जगात अत्यधिक महत्त्वाची आर्थिक ताकद बनविणे
९४) दिल्ली येथे पार पडलेल्या १९ व्या राष्ट्कुल स्पर्धेमध्ये तीनही पदके (सुवर्ण, रौप्य, कांस्य) कोणत्या खेळामध्ये भारताने जिंकले?
- थाळिफेक.
९५) सन २०१० चा आशियाई सर्वश्रेष्ठ वित्तमंत्रीचा पुरस्कार हा कोणास देण्यात आला आहे?
- प्रणव मुखर्जी
९६) देशातील कोणत्या राज्याचे स्थानिक उत्पन्न (GSDP) चा वृद्धिदर सर्वाधिक आहे?
- छत्तीसगढ.
९७) जी-२० राष्ट्रांचे वित्तमंत्री समूहाचे दोन दिवसीय सम्मेलन ऑक्टोबर २०१० मध्ये कोठे पार पडले?
- द. कोरिया.
९८) राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसाठी राज्यातील सर्व BPL धारकांना किंवा कुटुंबीयांना लाभ देणारे पहिले राज्य कोणते?
- हरियाणा.
९९) शिक्षणाच्या हक्कासंबंधी संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
- किशोर सिंग.
१००) चालू वर्षी २०१० मध्ये भारताचा आर्थिक वृद्धिदर हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार किती टक्के असेल?
९.७ टक्के.


    Source-- Loksatta