Tuesday, February 1, 2011

इजिप्तमधील राजकीय अस्थिरता

गेल्या सात दिवसांपासून इजिप्तमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या राजकीय अस्थिरतेचे नेमके कारण काय? इजिप्तची पार्श्वभूमी, पुढे काय होणार, आंतरराष्ट्रीय दबाव अशा अनेक विषयांवर प्रश्नोत्तर स्वरुपात घेतलेला हा आढावा.

इजिप्तमधील राजकीय अस्थिरता नेमकी कशामुळे आहे?
- उत्तर आफ्रिकेतील इजिप्तमध्ये अध्यक्ष होस्नी मुबारक यांनी पायउतार व्हावे, या मागणीसाठी जनतेने आंदोलन पुकारले आहे. या क्रांतीचा वणवा देशाच्या २८ पैकी ११ प्रांतांत पोचला आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संघर्षात ३०हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नेत्यांच्या पोस्टरची जाळपोळ, सरकारविरोधी घोषणाबाजी, सरकारी आस्थापनांवर हल्ले, दगडफेक अशा स्वरूपाच्या कारवाया सुरूच आहेत.
http://breakingnewsdir.com/wp-content/uploads/mvbthumbs/img_154236_egypt-unrest-and-the-path-forward.jpg
देशातील दारिद्य, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांची पातळी वाढल्यामुळे गेली तीस वर्षे सत्ता उपभोगणारे राष्ट्राध्यक्ष मुबारक यांच्याबद्दल जनतेमध्ये तीव्र असंतोष माजला आहे. गेल्या शनिवारी सकाळी शेकडो नागरिक राजधानी कैरोच्या ताहरीर स्क्वेअर या मुख्य चौकाच्या दिशेने निघाले असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ८२ वर्षीय मुबारक यांनी देशाला शांततेचे आवाहन केले. मात्र, सरकार बरखास्त करणारे मुबारक यांनी स्वत: राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, स्वत:च्या सर्व जवळच्या नातलगांची ब्रिटनला रवानगी केली आहे. नव्या सरकारची स्थापना तातडीने होण्याची शक्यता असून नव्या पंतप्रधानांचे नाव मुबारक यांच्याकडून जाहीर होईल.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते महंमद अल् बारदेई या आंदोलनात उतरले आहेत. पोलिसांनी बारदेई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारझोड केली, तरी राष्ट्रपतीविरोधी आंदोलन थंडावलेले नाही. बारदेई यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. इजिप्तच्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आंदोलनाने जोर धरला असून, पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. अश्रुधुराचा वापर केला जात आहे.

सरकारने मोबाइलवर घातलेली बंदी २४ तासांनी उठवली गेली; मात्र इंटरनेट सेवा अजूनही बंदच आहे. आंदोलनकर्त्यांनी एसएमएस; तसेच सोशल नेटवर्किंग साइटचे आंदोलनासाठी साह्य घेतले. देशातील सर्व संवेदनशील ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. लष्कराच्या तुकड्या रणगाड्यांसह सज्ज असून, इजिप्शियन म्युझियम, सेंट्रल बँक आणि कैरो युनिव्हर्सिटी आदी ठिकाणांना संरक्षण देण्यात आले आहे. इजिप्तची राष्ट्रीय विमानसेवा किमान १२ तास ठप्प होती. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी कैरोला जाणाऱ्या फेऱ्याही रद्द केल्या होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही या घटनेविषयी चिंता व्यक्त केली असून, देशाच्या राजकीय आणि आर्थिक फेररचनेसाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन मुबारक यांना केले आहे.इजिप्तची पार्श्वभूमी काय?
- नील नदीच्या किनाऱ्यावर वसलेले इजिप्त ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. इजिप्त आपल्या विशाल पिरॅमिडसाठी प्रसिद्ध आहे. येथे राष्ट्रपती होस्नी मुबारक यांनी १९८१ मध्ये सत्ता काबिज केली. अरब देशांत साऊदी अरब नंतर इजिप्त ही अर्थव्यवस्था दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. इस्रायल आणि पॅलिस्टिनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तने महत्त्वाची भूमिका बजावली होती. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार इजिप्तची लोकसंख्या ८.४५ कोटी आहे.
अरबी, इस्लाम आणि पेट्रोल
सुमारे दहा लाख वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेल्या इजिप्त या देशाची प्रमुख भाषा अरबी आहे. देशात इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माला मानणारे बहुसंख्य नागरिक आहेत. इजिप्तमधून पेट्रोलियम पदार्थ आणि कापूस हे मुख्यत्वे निर्यात केले जाते.
मुस्लिम ब्रदरहुड ही संघटना  इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची विरोधक संघटना आहे. इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहुड वर बंदी घालण्यात आली आहे.
आर्थिक उदारीकरण आणि  बेरोजगारी
होस्नी मुबारक हे एक आर्थिक उदारवादी राष्ट्रवादी नेता आहे. त्यांच्या सरकारने आर्थिक सुधारणांचे आश्वासन दिले होते. परंतु, असे असूनही इजिप्तमध्ये बेकारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच लोकांचे राहणीमानाच स्तर खालचा आहे. हेच प्रमुख कारण आहे की, देशात सरकार विरोधी लाट निर्माण झाली.
इजिप्तमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीवर परिणाम होत आहे. गेल्या सहा दिवसांपासून तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात ४.३ टक्के वाढून प्रति बॅरल ८९. ३४ डॉलर झाल्या आहेत. हीच जर स्थिती कायम राहिल्यास भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय विशेषज्ञ प्रा. ए. के. पाशा यांच्या मते, इजिप्त आणि ट्यूनिशियानंतर ही सरकारविरोधी लाट इतर अरब देशांमध्येही पसरू शकते. त्यामुळे भारतावर याचा सरळ परिणाम होईल. पश्चिम आशिया अशांतता निर्माण झाली त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होतो. तेलाच्या किंमती वाढल्याने महागाईत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी उत्पन्न गटाला मोठा फटका बसू शकतो.
इजिप्तमध्ये राजकिय परिस्थिती अस्थीर राहिल्यास त्याचा परिणाम समुद्रमार्गाने होणाऱ्या वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे. आशिया आणि युरोपमध्ये जलमार्गाने होणारा व्यापार हा इजिप्तच्या सुवेज कालव्याने जोडलेला आहे.


इजिप्तमध्ये पुढे काय होणार ?

देशात सुरू असलेल्या विरोधानंतर राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक हे आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करणार असतील तर पुढे काय होणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकार पडले तर त्यानंतर देशाची धुरा कोण सांभाळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
ट्यूनिशियामध्ये झालेल्या आंदोलनानंतर या प्रश्नाचे उत्तर शोधणे खूप कठीण झाले होते. लोकांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्यांची पूर्तता करणे येथे कठीण होऊन बसले होते.
इजिप्तमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षाचे सरकार असल्याने विरोधी पक्ष कमकुवत आहे. तसेच वैयक्ती आणि वैचारिक पातळीवर विरोधी पक्ष दुबळा आहे. इजिप्तमध्ये अशा परिस्थितीत स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका झाल्या तर मुस्लिम ब्रदरहुड या इस्लामिक पक्षाला व्यापक समर्थन मिळेल, असे राजकिय विश्लेषकांचे मत आहे.

मुस्लिम ब्रदरहुड हा आधिकृत दृष्ट्या बंदी घातलेला पक्ष आहे. परंतु त्याचे अस्तित्व आता बहुतांशी ठिकाणी जाणवते आहे. इजिप्तमध्ये ही एकमेव संघटना आहे, की ज्यात हजारोंच्या संख्येने लोक सामिल झाले आहे. २००५मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये या पक्षाला काही जागा मिळाल्या होत्या. पक्षाचे सदस्य अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.
राष्ट्राध्यक्ष मुबारक यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर हे इस्लामी क्रांति होणार असल्याचे भासवून आपल्या आंतरराष्ट्रीय सहकार्यांना घाबरवत आहेत.
मुस्लिम ब्रदरहुड या संघटनेने या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला नाही. पश्चिमात्य देशांनी इजिप्तच्या धार्मिक विश्वासांना आणि अपेक्षांचा सन्मान केला पाहीजे असे मत मुस्लिम ब्रदरहुडचे नेते अल एरियान यांनी सांगितले आहे.

अरब देशात इतरत्र अशी असंतोषाची लाट आहे का?
आखातातील तसेच आफ्रिकेतील काही मुस्लिम देशांमध्ये तरुणांनी भ्रष्ट नेत्यांना विरोध करण्यासाठी हिंसक क्रांती सुरू केली आहे. ट्युनिशिया, येमेन पाठोपाठ आता इजिप्तमध्ये देखिल अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याचे वृत्त आहे. जॉर्डनमध्येही सत्ताधा-यांविरोधात जनतेत नाराजी असल्याचे चर्चा जोरात सुरू आहे.

इजिप्तमधील हिंसक आंदोलन
 उत्तर आफ्रिकेतील इजिप्तमध्ये राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्या भ्रष्ट कारभाराला जोरदार विरोध होत आहे. तरुणांनी रस्त्यावर उतरुन हिंसक पद्धतीने राष्ट्रपती आणि सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संघर्षात ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप ठिकठिकाणी नेत्यांचे पोस्टर जाळणे, सरकार विरोधी घोषणाबाजी करणे, सरकारी आस्थपनांवर हल्ले करणे अशा स्वरुपाच्या कारवाया सुरूच आहेत.

राष्ट्रपती मुबारक यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात शांततेचे आवाहन केले आहे. सरकार बरखास्त करणा-या राष्ट्रपतींनी स्वतः राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र स्वतःच्या सर्व जवळच्या नातलगांची रवानगी इंग्लडला केली आहे.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष नोबेल विजेते मोहम्मद अल बारदेई यांनी होस्नी मुबारक यांचा विरोध करण्यासाठी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी मोहम्मद अल बारदेई आणि त्यांच्या सहका-यांनी मारझोड केली तरी राष्ट्रपती विरोधी आंदोलन थंड पडलेले नाही. अखेरच्या वृत्तानुसार, इजिप्तच्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्याविरुद्धच्या आंदोलनाने जोर पकडला आहे. पोलिसांनी आंदोलकांची धरकड सुरू केलीय. प्रशासनाने मोबाइल तसेच इंटरनेट सेवा बंद केली आहे. मोहम्मद अल बारदेई यांना नजरकैद करण्यात आले आहे. देशातील सर्व संवेदनशील ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली आहे.

ट्युनिशियाच्या जनतेचा असंतोष
राष्ट्रपती जॉईल अल अबीदीन यांच्या भ्रष्ट कारभाराचा विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. मागील २३ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रपती अबीदीन यांनी चालवलेला मनमानी थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची नागरिकांची तयारी झालेली आहे.

डिसेंबर महिन्यात एका बेरोजगार तरुणाने स्वतःला पेटवून घेतले होते. त्याचा चार जानेवारी रोजी मृत्यू झाला आणि अबीदीन प्रशासनाविरुद्ध नाराज झालेले नागरिक रस्त्यावर आले. परिस्थिती इतकी चिघळली की, अबीदीन यांनी देश सोडून थेट सौदी अरेबियात राजकीय आश्रय घेतला आहे. राष्ट्रपतींच्या पत्नी दिड टन सोनं घेऊन देशातून पळून गेल्याचे बोलले जात आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान मोहम्मद घानोची यांनी नव्याने सरकार स्थापन करुन तब्बल १२ नव्या कॅबिनेट मंत्र्यांची सोबत घेत देश सावरायचे प्रयत्न सुरू केले आहेत.

येमेनचे संकटः
 मागील ३२ वर्षे येमेनमध्ये अनभिषिक्त सम्राटासारखे सत्ता उपभोगत असलेल्या राष्ट्रपती अली अब्दुल्लाह सालेह यांच्या विरोधात ठिकठिकाणी दंगली सुरू आहे. विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी सरकार आणि नागरिक यांच्यातच तीव्र संघर्ष सुरू आहे. मात्र अद्याप राष्ट्रपतींनी नागरिकांची बाजू ऐकून कोणतेही परिवर्तन केलेले नाही. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा साथीदार असलेल्या येमेनमध्ये सुरक्षा पथकांच्या मदतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

होस्नी मुबारक यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आहे का?
इजिप्तमध्ये होणाऱ्या आंदोलनामुळे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांच्यावर जगभरातून दबाव वाढत आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी होस्नी मुबारक यांना इजिप्तची परिस्थिती सुधारण्याची आणि हिंसक आंदोलन संपविण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्याही परिस्थिती निशस्त्र लोकांवर बळाचा वापर करून नये, आंदोलनकर्त्यांना आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहचविण्याची संदी मिळायला हवी, असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान कॅमरून, जर्मनीचे चान्सलर एंजला मर्कल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सारकोजी यांनी केले आहे.
अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इजिप्तमध्ये लोकशाही प्रस्थापित होत असते तर इजिप्तच्या जनतेला समर्थन देण्याची घोषणा केली आहे. 


Source---

धगधगत इजिप्त!
स्टार माझा वेब टीम

No comments:

Post a Comment