Saturday, February 18, 2012

पूर्वपरीक्षेचे अभ्यास नियोजन

अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाच्या तयारीसाठी वेगवेगळी पद्धत अवलंबून तो विषय सोपा करून घेतल्यास अभ्यास करणे सोईस्कर ठरते

1) कला शाखा घटक
*****इतिहास
**इतिहासात विचारले जाणारे प्रश्न मुख्यत्वेकरून पाठांतर किंवा स्मरणावर आधारित असतात; परंतु अलीकडे प्रश्नपत्रिकेच्या बदलता प्रवाह पाहिल्यास लक्षात येते की, विश्लेषणात्मक प्रश्नही विचारले जात आहेत. उदाहणादाखल या वेळच्या एस. टी. आय. च्या परीक्षेत विचारलेले इतिहासाचे प्रश्न तपासून पाहा.

**म्हणूनच केवळ पाठांतर किंवा स्मरणावर भर न देता ऐतिहासिक घटनांमधील कार्यकारण भावही समजून घेण्याचा प्रयत्न करा. उदा. एखाद्या घटनेचा परिणाम म्हणून पुढे कोणती घटना घडली. एखादी विशिष्ट चळवळ लोकप्रिय का झाली नाही? इ. म्हणजे 1857 ते 1947 पर्यंत घडलेल्या घटनाक्रमांचे ठळक टप्पे तयार करा व प्रत्येक टप्प्यातील प्रमुख घटनांची एकमेकांशी सांगड घालून लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही 1857 ते 1885, 1885 ते 1920, 1920 ते 1940, 1940 ते 1947 असे टप्पे पाडून त्याचा तक्ता तयार केल्यास इतिहासाचा अभ्यास अजूनच सोपा होईल.

*****समाजसुधारक

**पूर्वपरीक्षेत या घटकांवर सरासरी 6 ते 8 प्रश्न विचारले जातात. खरे तर या घटकाचा अभ्यास करताना पाठांतर खूपच महत्त्वाचे ठरते. कारण समाजसुधारकांचे जीवन, कार्य यांच्याविषयी अत्यंत बारीक तपशिलात जाऊन प्रश्न विचारले जातात.

**मात्र, आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास लक्षात येते की, काही निवडक समाजसुधारकांवरच मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. उदा. महात्मा फुले, आंबेडकर, आगरकर, न्यायमूर्ती रानडे इ. अशा निवडक महत्त्वाच्या समाजसुधारकांची माहिती अगदी बारीक-सारीक तपशिलासह पाठ करणे व इतर समाजसुधारकांनी केलेली ठळक कार्ये पाठ करून ठेवणे. समाजसुधारकांची माहिती जर 3-4 पानांत तक्ता स्वरूपात जमवून ठेवल्यास परीक्षेच्या वेळी उजळणी करणे सोपे जाते.

****भूगोल

**मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता लक्षात येते की, 10 वीपर्यंतच्या शालेय क्रमिक अभ्यासक्रमावरच बरेचसे प्रश्न विचारलेले असतात. मात्र, यातही राज्यसेवा पूर्वपरीक्षेत भारताच्या भूगोलाच्या तुलनेत महाराष्टÑाच्या भूगोलावर अधिक भर दिलेला दिसतो.

**या विषयातील लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे की, बरेचसे प्रश्न ठळक बाबींवर आधारित असतात. त्यामुळे सूक्ष्म माहिती दोन-तीनदा वाचून ठेवावी आणि ठळक बाबींचे चांगल्या प्रकारे पाठांतर करावे.

*****भारतीय राज्यपद्धती
याही घटकावर पूर्वपरीक्षेत सरासरी 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. या घटकाचा विचारल्या जाणाºया प्रश्नांची संख्या पाहता खूपच जास्त अभ्यास करावा लागतो; परंतु पूर्वपरीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, याचा एकदा अंदाज आला की, पूर्ण गुण मिळविण्यासाठी त्याचा फायदा होतो. तसेच या घटकाकडे थोडे जागरूकपणे, सजगपणे पाहिल्यास लक्षात येते की, या घटकाच्या अभ्यासाचा उपयोग आपल्या दैनंदिन राजकीय घडामोडी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास होतो. तसेच इतिहास या विषयातील महत्त्वाचे कायदे व घटना तयार करण्याचे कार्य यांच्याशी सांगड घातल्यासही पाठांतराचे काम सोपे होऊ शकते.

*****ग्राम प्रशासन

**ग्राम प्रशासन या विषयाची व्याप्ती फार मोठी नाही, तसेच आकलन, पाठांतरासही हा विषय सोपा असल्याने कला शाखा घटकातील पूर्ण गुण मिळवून देणारा हा घटक आहे. ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांचे स्वरूप, रचना, भूमिका कार्ये इ. बाबींवर प्रश्न विचारले जातात. आकलनात्मक प्रश्न अपवादानेच विचारले जातात. त्यामुळे माहितीचे पुरेपूर पाठांतर केल्यास थोड्याफार कालावधीत गुणवत्तापूर्ण अभ्यास वेगाने होऊ शकतो.

2) कृषी

**भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी-आधारित आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचे दूरगामी परिणाम भारतातील विविध क्षेत्रांत दिसून येतात. म्हणूनच उमेदवाराला प्रशासनाच्या दृष्टिकोनातून कृषीविषयक घटकांचे किमान ज्ञान व्हावे, यासाठी या घटकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. ही प्रस्तावना सांगण्याचे कारण म्हणजे बहुसंख्य उमेदवारांना हा विषय नकोसा व कठीण वाटतो. मात्र, ग्रामीण भागात काम करताना याचा व्यावहारिक उपयोग लक्षात येतो.

***कृषी विद्यापीठांतर्फे प्रकाशित केल्या गेलेल्या कृषी डायरीचादेखील वापर अनेक विद्यार्थी करतात. मात्र, त्यात नक्की काय व कसे वाचावे? याविषयी निवड झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधल्यास बरे होईल.

या अंतर्गत प्रश्न विचारले जाणारे प्रमुख घटक :

जमिनीचा वापर व प्रमुख पिके
जलसिंचन
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
फलोत्पादन
वनोत्पादन व वनविकास
मत्स्य व्यवसाय
कृषी अर्थव्यवसाय इ.


**या विषयीचा अभ्यास करताना लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे की, निवड झालेल्या उमेदवारांनी सुचवलेली निवडक 2-3 पुस्तकेच पुन्हा-पुन्हा वाचावीत. कारण कितीही अभ्यास केला तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांना न सुटणारे असे काही प्रश्न या घटकांत असतातच. त्यामुळे गुणांची एक सरासरी पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा;   अन्यथा नाहक वेळ वाया जाऊन त्याचा परिणाम इतर घटकांच्या अभ्यासाच्या गुणवत्तेवर होऊ शकतो.

3) चालू घडामोडी

***या घटकांवर पूर्वपरीक्षेत सरासरी 25 ते 30 गुणांचे प्रश्न विचारले जातात. या घटकांच्या अभ्यासाचा उपयोग केवळ पूर्वपरीक्षेपुरता न राहता तो मुख्य परीक्षेत तसेच मुलाखतीमध्येही मोठ्या प्रमाणात होतो. किंबहुना तुम्ही या विषयाचा अभ्यास न करण्याचा विचारच करू शकत नाही. अनेक विद्यार्थी वर्षभर आधीपासून वर्तमानपत्रांचे वाचन व त्याच्या छोट्या टिपा तयर करून ठेवात, तर काही विद्यार्थी वर्षभर वर्तमानपत्रे न वाचता शेवटच्या तीन- एक महिन्यांत बाजारात चालू घडामोडींवर आधारित जी पुस्तके येतात, त्यांचा अभ्यास करतात. यापैकी ज्यांना जी पद्धत योग्य वाटते ती ते अवलंबू शकतात. यातील कोणतीही पद्धत चुकीची नाही.

हमखास गुण मिळवा

कृषी, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला शाखा या प्रत्येक घटकाच्या बाबतीत काहीतरी नवीन घडत असते. अशा अनेक घटकनिहाय चालू घडामोडी असतात. ज्या हमखास गुण मिळवून देणा-या असतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास व उजळणी करणे फायद्याचे ठरते.

4)बुद्धिमापन चाचणी
***एकूण 200 गुणांच्या प्रश्नपत्रिकेत या विभागाला 50 गुण असतात. म्हणजेच एकूणात या विषयाचे 25% प्रश्न असतात. यावरून पुढील गोष्टी लक्षात येतात.

-उत्तीर्ण होण्यासाठी या विषयाची असलेली निर्णायकता.

-सातत्यपूर्ण अभ्यासाची आवश्यकता.

***म्हणूनच खाली दिलेले सर्वसाधारण अभ्यासतंत्र किंवा स्टेप्स वापरल्यास तुम्ही हा निर्णायक टप्पा गाठू शकता.

**सर्वप्रथम बुद्धिमापनासाठी असणाºया मूलभूत पुस्तकांमधून सर्व प्रकारची उदाहरणे समजावून घ्यावीत. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून गणितांचा नियमित सराव करावा. यावरून कोणत्या काठिण्य पातळीवरचे प्रश्न विचारले जातात, याचा अंदाज येतो. वेग व अचूकता वाढवता येते. पुरेसा सराव झाल्यानंतर रोजच्या रोज वेळ लावून एकेक प्रश्नपत्रिका सोडवणे.

**प्रत्यक्ष पेपर सोडवतानाचे नियोजन : सर्वसाधारणपणे नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी गुणांचा एक ठराविक टप्पा सहज गाठतात; परंतु निवड होण्यासाठी आवश्यक गुणांमधील शेवटचे निर्णायक 5 ते 10 गुण बुद्धिमापन चाचणी या विषयाच्या आधारे मिळवून यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत तुम्ही येऊ  शकता.

**प्रत्यक्ष परीक्षेत जेव्हा बुद्धिमापन हा विभाग सोडवताना विद्यार्थी अनेकदा गोंधळून जातात. एखाद्या प्रश्नातच अडकून पडल्याने, उत्तर लवकर काढता न आल्याने असे होते. बºयाचदा काही प्रश्नांची उत्तरे पर्यायावरूनही काढता येतात. हे काहींना लक्षात येत नाही किंवा त्याकडे फारसे लक्ष  दिले जात नाही. अशा काही युक्त्यांचा वापर करता येतो.

******पेपर सोडवताना बुद्धिमापन हा विभाग सर्वप्रथम सोडवावा की, सर्वात शेवटी याबाबतही संभ्रम असतो. मात्र, ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड असू शकते. ज्यांना जसे सोयीस्कर वाटेल तशाच क्रमाने पेपर सोडवावा. प्रश्नपत्रिका सोडवल्याचा सराव करत असताना तुम्हाला कोणती पद्धती सोयीस्कर ठरते, याचा तुम्ही पडताळा घेऊ शकता.

5)विज्ञान व तंत्रज्ञान
वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन
आधुनिकीकरण व विज्ञान.
जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती.
वैज्ञानिक प्रगतीचे शहरी व ग्रामीण जीवनावर झालेले परिणाम.
भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय.


***राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विचारल्या जाणाºया विविध घटकांपैकी सर्वसाधारणपणे 25 ते 30 प्रश्न विज्ञानविषयक घटकांवर विचारले जातात. त्यामुळे हा घटक दुर्लक्षून चालणार नाही.

***विषयाचा बाऊ करून घेण्याचे कारण नाही - प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे की, कोणतीही पदवी असणाºया विद्यार्थ्याला विज्ञानविषयक अभ्यासक्रमाशी संबंधित जे साधारण ज्ञान अपेक्षित असते, त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची विज्ञान विषयात पदवी नाही, त्यांना या विषयाचा बाऊ करून घेण्याचे कारण नाही.

प्रश्न विचारण्याचा बदलता कल : विज्ञान तंत्रज्ञान विषयाबाबत अप्लाईड सायन्सपेक्षा प्युअर सायन्सचे प्रश्न विचारण्याकडे कल वाढला आहे. त्यानुसार या विषयातील मूलभूत संकल्पना समजावून घेणे महत्त्वाचे आहे.
***संदर्भ साहित्य : यासाठी 6 ते 10 वीपर्यंतच्या शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास अत्यंत मूलभूत पातळीवर करावा. याशिवाय बाजारात उपलब्ध के. सागर विज्ञानविषयक घटक पुस्तक व रंजन कोळंबी यांचे विज्ञान-तंत्रज्ञान ही पुस्तके पुरेशी ठरतात. एवढे करूनही दरवर्षी काही प्रश्न असे विचारले असतात, की त्याची आपण तयारी केलेली नसते किंवा त्यांचा माहिती स्रोत आपणांस सापडत नाही. त्यामुळे जेवढी तयारी करणे शक्य आहे, तेवढी पूर्ण व व्यवस्थित करणे आवश्यक आहे. एवढ्या तयारीने 30 पैकी 23/24 गुण मिळवता येतात.

6)वाणिज्य व अर्थव्यवस्था :

भारतीय आयात व निर्यात
राष्ट्रीय विकासात सरकारी, सहकारी, ग्रामीण बँकांची भूमिका.
शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प लेखा, लेखा परीक्षण इ.
पंचवार्षिक योजना.
किमती वाढवण्याची कारणे व उपाय.


***याही घटकांवर राज्यसेवा पूर्वपरीक्षेत सरासरी 30 गुणांचे प्रश्न विचारले जातात. बºयाच विद्यार्थ्यांचा असा समज असतो की, वाणिज्य हा केवळ आकड्यांचा विषय आहे; पण वस्तुत: या विषयाकडे   एक चक्र म्हणूनच पहायला हवे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था नक्की कशी फिरते, त्यांचे आपल्यावर नेमके काय परिणाम होतात, याबद्दल कुतहल वाटणे साहजिकच आहे. तेव्हा या गोष्टी जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे.

***अलीकडे प्रश्नपत्रिकेमध्ये झालेले बदलही नीट समजून घेतले पाहिजेत. अलीकडे अर्थशास्त्रीय सिद्धांतावरचे प्रश्न कमी झालेले आहेत. असे काही बदल ध्यानात घेऊनच मगच त्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करावी. संदर्भ साहित्य :
के-सागरचे वाणिज्य व अर्थव्यवस्था.
महाराष्टाची आर्थिक पाहणी. (इकॉनॉमिक सर्व्हे)

अर्थशास्त्राचा अभ्यास करताना त्याचा मूलभूत संकल्पना एस. एल. आर. रेपो रेट, बँक दर, रोखे बाजार इ. आहे. एखाद्या बेसिक पुस्तकातून किंवा मार्गदर्शकाच्या साहाय्याने समजून घेतल्यास अर्थशास्त्राचा अभ्यास अत्यंत सोपा होतो.

*********

 माहिती तंत्रज्ञान ह्या विषयावर यावर्षीपासून १५-२० प्रश्न विचाण्यात येईल ....!!!!

No comments:

Post a Comment