Tuesday, January 3, 2012
महात्मा गांधी
मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, १८६९ - जानेवारी ३० १९४८)
**रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली.
**नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.
**गांधीजीना पहिले यश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकर्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे, यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकर्यांची गावे अत्यंत धाणेरडी आणि आरोग्य हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, परदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडा मध्येसुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला ज्याद्वारे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व सखोल अभ्यास केला.
**मार्च १९३१ मध्ये गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार ब्रिटिश सरकारने सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करण्याचे मान्य केले आणि त्याबदल्यात कायदेभंगाची चळवळ बंद करण्याची मागणी घातली.याबरोबरच गांधीजींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकमेव प्रतिनिधी म्हणून लंडनमध्ये होणार्या गोल मेज परिषदेचे आमंत्रण दिले. ही परिषद गांधीजी आणि पक्षासाठी निराशाजनकच ठरली, कारण त्यामध्ये सत्तांतरणावर भर देण्याऎवजी भारतातील राजे-रजवाडे आणि अल्पसंख्यक यांच्यावर जास्त भर देण्यात आला होता.
**गांधीजींना दोन वर्षासाठी पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये बंदिवासात ठेवण्यात आले. तेथील वास्तव्यात गांधीजींना वैयक्तिक आयुष्यात दोन धक्के सहन करावे लागले. सहा दिवसांनंतरच त्याचे खाजगी सचिव महादेव देसाई वयाच्या ५०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा १८ महिन्यांच्या बंदिवासानंतर २२ फेब्रुवारी १९४४ ला मरण पावल्या. ६ अठवड्यांनंतरच गांधीजींना तीव्र मलेरिया झाला. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे आणि ऑपरेशनच्या आवश्यकतेमुळे त्यांना युद्ध संपण्याआधीच ६ मे १९४४ ला सोडण्यात आले. ते बंदिवासात मरण पावले तर संपूर्ण देश संतप्त होईल अशी भीती ब्रिटिश सरकारला वाटत होती.
**मृत्यू
३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते.
**लिखित पुस्तके
गांधीजींनी अनेक पुस्तकेसुद्धा लिहिली आहेत. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रकाशित आहे.
त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील संघर्षावर त्यांनी "Satyagraha in South Africa (दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह)" हे पुस्तक लिहिले आहे. तसेच त्यांनी "हिंद स्वराज" किंवा "Indian Home" ही राजकीय पुस्तिका लिहिली आहे आणि जॉन रस्किनच्या "Unto This Last" चे गुजराती भाषांतर केले आहे.[२१] हा शेवटचा लेख त्यांच्या अर्थशास्त्रावरील विचारसरणीचे वर्णन करतो.
मराठीमध्ये पु. ल. देशपांडे यांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे.
**गांधीजींवरील चित्रपट--
ब्रिटीश दिग्दर्शक सर रिचर्ड ऍटनबरो यांनी गांधीजींच्या आयुष्यावर आधारित इंग्रजी चित्रपटाची निर्मिती केली. यात महात्मा गांधींची भूमिका बेन किंग्जले या ब्रिटीश अभिनेत्याने केली. हा चित्रपट १९८१ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ८ ऑस्कर पुरस्कार जिंकून त्या वेळेसचा विक्रम स्थापला होता. या चित्रपटाचे जगातील सर्वच मुख्य भाषेत भांषांतर झाले असून बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगले यश मिळवले
*********in short....
जन्म: ऑक्टोबर २, १८६९ पोरबंदर, काठियावाड
मृत्यू: जानेवारी ३०, १९४८ नवी दिल्ली, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
प्रमुख स्मारके: राजघाट
धर्म: हिंदू
प्रभाव: ल्येव तलस्तोय गोपाळ कृष्ण गोखले
पत्नी: कस्तुरबा गांधी
अपत्ये: हरीलाल मणिलाल रामदास देवदास
Subscribe to:
Post Comments (Atom)
ReplyDeleteBest Article for All Users thanks for sharing this information.
Please See out Latest Services Below:-
Call Us 8800470037 for custom house agent,custom agent india, custom clearing agent delhi
We Also Provides Services Like freight forwarder in india, Freight Forwarders Near Me, Freight Forwarding Companies
Khalitrucks is one of the best transport company in india, Transporters Delhi,
Call Us Today Or Book Trucks Online, Truck Book Online
Call +91-7827623969 for Web Design Training Delhi
Call 8250081907 For Website Design Servies Delhi, Web Design Company Delhi, Web Development Company Delhi, SEO Company Delhi
Nice post thanks for sharing informative blogs.. keep sharing. Call 9871599566 for best web designing training course in delhi.
ReplyDeleteWeb Designing Course in Delhi
Best web designing course institute in delhi