Wednesday, January 4, 2012

संयुक्त राष्ट्रसंघाशी निगडीत महत्त्वाच्या संस्था

***आंतरराष्ट्रीय विकास संघ***
स्थापना: २४ सप्टेंबर १९६०
प्रमुख कार्य:
१.जागतिक बॅंकेकडून व्यवस्थापन.
२.कर्जपुरवठा करणे
मुख्यालय: वॉशिंग्टन
सदस्य संख्या: १३७.

***आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ ****
स्थापना: जुलै १९५६.
प्रमुख कार्य:
१.जागतिक बॅंकेशी संलग्न.
२.मागास देशातील खासगी उद्योगांना प्रोत्साहन देणे.
मुख्यालय : वॉशिंग्टन.
सदस्य : १३७.

***आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटना***
स्थापना: ४ एप्रिल १९४७.
प्रमुख कार्य:
१.आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरळीत करणे,
२.हवाई वाहतूक सुरक्षित व कार्यक्षम होण्यासाठी प्रयत्न करणे,
३.अविकसित प्रदेशात हवाई वाहतुकीचा प्रसार करणे.
मुख्यालय : मॉटि्रयल.
सदस्य संख्या : १५०.

***आंतरराष्ट्रीय दूर संचरण संघ***
स्थापना: १ जानेवारी १९३४ (पूर्वीच अस्तित्वात असलेल्या दोन संघटनांचे एकत्रीकरण करून खढण अस्तित्वात)
प्रमुख कार्य:
१.दूरध्वनी, रेडिओ, तारायंत्र यांच्या उपयोगात जागतिक पातळीवर समन्वय साधणे
२.आंतरउपग्रहीय दळणवळण सुध्दा सध्या संघाच्या मार्फतच होत असते.
मुख्यालय : बर्न.
सदस्य संख्या : १५६ राष्ट्र.

***जागतिक पोस्ट संघ***
स्थापना : १ जुलै १८७५ इ.स. १९४७ पासून युनोशी संलग्न.
प्रमुख कार्य:
१.विविध राष्ट्रातील पत्रांची देवाण-घेवाण सुकर करणे
मुख्यालय : बर्न
सदस्य संख्या : १५६ राष्ट्रे.

***जागतिक हवामान संघटना***
स्थापना: १९ मार्च १९४१
प्रमुख कार्य:
१.जागतिक पातळीवर हवामानाच्या विविध माहितीत सुसूत्रता आणणे,
२.हवामान निरीक्षणाच्या पध्दतीत अचूकता आणणे,
३.मागास राष्ट्रांना हवामानविषयक सांख्यिकी व तांत्रिक सहाय्य देणे
मुख्यालय : जिनेव्हा.
सदस्य संख्या : १५१ राष्ट्रे.

****संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था***
प्रमुख कार्य:
1)आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक सहकार्य करणे
2)युनोच्या औद्योगिक प्रगतीविषयक कार्यक्रमांचे सुसूत्रीकरण करणे,
3)अविकसित राष्ट्रांना औद्योगिक धोरणे ठरविण्यास सर्व प्रकारचे सहाय्य करणे
मुख्य कचेरी : व्हिएन्ना.

***आंतरराष्ट्रीय अणुशक्ती अभिकरण***
स्थापना: २९ जुलै १९५७.
प्रमुख कार्य:
१.अणुशक्तीचा शांततापूर्ण कारणांसाठी वापर करण्यास प्रोत्साहन देणे
मुख्यालय : व्हिएन्ना.
सदस्य संख्या : ११ राष्ट्रे.

***आंतरराष्ट्रीय सागरी संघटना***
स्थापना: मार्च १९४८
पूर्वीचे नाव : आंतरशासकीय सागरी संमंत्रक संघटन
प्रमुख कार्य:
१.सागरीमार्गाने होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार वृध्दिंगत होण्यासाठी सुविधा उपलब्ध करणे
२.सागरी प्रवास अधिकाधिक सुरक्षित हो


****संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बालकांसाठीचा अनुशासन निधी***
स्थापना: १९४६
प्रमुख कार्य:
१.बालकांच्या कल्याणासाठी झटणारी जागतिक संघटना.
२.जगातील हजारो बालके दरवर्षी विविध रोगांना बळी पडतात.
३.या रोगांवर नियंत्रण करणे, मुलांच्या सार्वत्रिक विकासासाठी आर्थिक सहाय्य करणे
मुख्यालय : न्युर्यॉक.
सदस्य संख्या : ८८ राष्ट्रे
या संघटनेला १९६५ चे नोबेल शांतता पारितोषिक मिळाले.

***आंतरराष्ट्रीय कृषि विकास निधी***
स्थापना: ३० नोव्हेंबर १९७७
प्रमुख कार्य:
१.तिसर्‍या जगातील अन्न तुटवडा. शेती उत्पादन वाढवून कमी करण्यासाठी
२.शेतीच्या सार्वत्रिक विकासासाठीचा निधी.
मुख्यालय : रोम.

****जागतिक व्यापार विषयक करार-गॅट***
स्थापना: १ जानेवारी १९४८
प्रमुख कार्य:
१.आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ होण्यासाठी संकेत ठरविणे,
२.अविकसित राष्ट्रांना निर्यातीस प्रोत्साहन देणे
मुख्यालय : जिनेव्हा.

****संयुक्त राष्ट्र निर्वासितांचा उच्चआयुक्त***
स्थापना: १ जानेवारी १९४१
प्रमुख कार्य:
१.आंतरराष्ट्रीय वादग्रस्त प्रदेशातील निर्वासितांचे प्रश्न सोडविणे,
२.त्यांना कायमचे निवासंस्थान मिळवून देणे,
३.त्यांच्या मूळ देशात परत जाण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे,
या संघटनेला १९८१ चे नोबेल शांतता पारितोषिक मिळाले आहे.
मुख्यालय : जिनिव्हा.
*अशाच प्रकारच्या आणखी दोन समित्या अस्तित्वात आहेत त्या अशा:-
१.संयुक्त राष्ट्रसंघ अनर्थ सहाय्य समन्वयक भूंकपासारख्या संकटात मदतीसाठी.
२.संयुक्त राष्ट्र दरवर्षी निर्वासितांसाठीची सहाय्य समिती. इस्त्रायेलच्या निर्मितीनंतर निर्वासित झालेल्या पॅलेस्टाईन नागरिकांच्या सहाय्यासाठी.*

***संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम***
स्थापना: १८९२.
प्रमुख कार्य:
१.पर्यावरण संरक्षण व संवर्धन
२.प्रदूषणमुक्ती
३.पर्यायी ऊर्जा वापर कार्यक्रम राबविले जातात
मुख्यालय : नैरोबी.
सदस्य संख्या : ६०

***संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कार्यक्रम निधी***
स्थापना: १९६७
प्रमुख कार्य:
१.विकसित आणि अविकसित राष्ट्रांतील लोकसंख्या विषयक प्रश्नांचा अभ्यास करणे,
२.त्या विषयाची जागृती निर्माण करणे,
३.लोकसंख्याविषयक प्रश्न सोडविण्यास संबंधित राष्ट्रांना मार्गदर्शन करणे
मुख्यालय : न्युर्यॉक.
सदस्य संख्या : १३०.

******युनोशी संलग्न इतर संस्था व संघटना*********

१. जागतिक बौध्दिक संपत्ती (जिनेव्हा)

२. संयुक्त राष्ट्र विश्वविद्यालय(टोकियो)

३. संयुक्त राष्ट्र आर्थिक विकास निधी

४. आंतरशासकीय संघटना

५. आशिया आणि पॅसिफिकसाठीचा आर्थिक व सामाजिक आयोग

No comments:

Post a Comment