***स्वातंत्र्योत्तर काळातही महात्मा गांधीच्या विचारांचा आणि शिकवणुकीचा प्रसार करणारे गांधीवाधी नेते, गुरू म्हणून विनोबा भावे यांना ओळखले जाते. गांधीजींचे
**आध्यात्मिक वारसदार असेही त्यांना म्हटले जात असे. ११ सप्टेंबर १८९५ मध्ये तत्कालीन कुलाबा जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. भगवद्गीतेचा, त्यातील तत्वज्ञानाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता भगवद्गीतेचा त्यांनी मराठीत समश्लोकी अनुवाद केला आहे.
**विनोबाजींची 'भुदान' चळवळही अभिनव ठरली. तिची इतिहासात नोंद झाली आहे. यासाठी त्यांनी संपुर्ण भारतात पदयात्रा केली. त्याला खुप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक तरूणांना त्यांच्या चळवळीने प्रेरणा दिली होती. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मुस्लिमांच्या कुराण धर्मग्रंथाचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले.
**त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणुन १९८३ मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
जीवनपट :
जन्म - ११ सप्टेंबर १८९५ (गागोदे)
भुदान चळवळीचे प्रणते.
महात्मा गांधींच्या विचाराचे अध्यात्मी वारस
मुळ नाव - विनायक नरहर भावे.
१९४० वैयक्तीक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही.
गांधीनी त्यांचे नाव विनोबा ठेवले.
गितेचे सुप्रसिध्द समश्लोकी मराठी रूपांतर 'गिताई' सुप्रसिध्द.
पुस्तके - 'गिता प्रवचने' , मधुकर, स्थितप्रज्ञदर्शन, पुराण सार, स्त्रिस्त धर्मसार, जपुजी,संतांचा प्रसाद,विचार पोथी, विण्णूसहस्त्र नाम,उपनिषदांचा अभ्यास.
महाराष्ट्र्र फंड. नावाचा मासिक चालवीले.
मृत्यु - १५ नोव्हेंबर १९
No comments:
Post a Comment