Wednesday, January 4, 2012

संयुक्त राष्ट्रसंघ (युनो)

***स्थापना
पहिल्या महायुध्दानंतर अस्तित्वात असलेली 'लीग ऑफ नेशन्स' ही संघटना बरखास्त करून त्याच संघटनेचे व्यापक रूप म्हणून 'संयुक्त राष्ट्रसंघ' (युनो ूण्ै) या नव्या संघाची स्थापना दुसर्‍या महायुध्दानंतर पन्नास प्रमुख राष्ट्रांनी एकत्र येऊन दि. २६ जून १९४५ रोजी युनोच्या सनदेला सॅन फ्रन्सिस्को येथे मान्यता दिली. व दि. २४ ऑक्टोबर १९४५ रोेजी 'युनो' अस्तित्वात आले.

युनोचे सदस्यत्व जगातील कोणत्याही राष्ट्राला घेता येते. मात्र त्या राष्ट्राचा जागतिक शांतता सद्भावना यावर विश्वास असला पाहिजे, त्या राष्ट्राला युनोची सनद मान्य असली पाहिजे, त्या राष्ट्राला युनोचे सभासदत्व घेतल्यानंतरच्या जबाबदारीची जाणीव असून ती जबाबदारी घेण्याची त्याची तयारी असली पाहिजे.

***उद्दिष्टे:
१.आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामंजस्य कायम ठेवणे
२.राष्ट्राराष्ट्रांत संघर्ष कमी करून मैत्रीपुर्ण आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे
३.व्यक्ती व्यक्तींचे स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांची जोपासना व संवर्धन करणे.
४.मानवी दृष्टीकोनातून तसेच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या प्रसंगातून मार्ग काढणे व समस्या दुर करणे.
५.जगातील सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नती विकासासाठी आंतरराष्ट्रीय श्रमशक्ती आणि यंत्रशक्तीचा उपयोग करणे.

**युनोचे मुख्यालय :

युनोची मुख्य कचेरी न्यूर्यॉक (अमे िरका) येथे ईस्ट नदीच्या काठावरील भव्य अशा ४० मजली इमारतीमध्ये आहे. ही इमारत जॉन रॉक फेलर यांनी दिलेल्या १७०एकर जमिनीवर उभी आहे. पत्ता: फर्स्ट अ‍ॅव्हेन्यु, यु.एन.प्लाझा, न्युर्यॉक ण्. ष्. १००१७, ूश्अ

****युनोच्या मुख्य भाषा :
युनो ही आंतरराष्ट्रीय संघटना असल्याने तिचे कामकाज एकुण ६ प्रमुख भाषामध्ये चालते. इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज आणि अरेबिक.

**युनोचे ध्वज :
फिकट निळया रंगाच्या कापडावर पांढर्‍या रंगाने युनोचे बोधचिन्ह असलेला ध्वज.

**युनोचे बोधचिन्ह :

पृथ्वीच्या भोवती ऑलिव्ह झाडाच्या दोन फांद्या.
युनोचे स्वत:चे स्वतंत्र पोष्ट ऑफिस आणि टपाल तिकिटे आहेत. युनो संघटनेमध्ये सुमारे ५२,००० व्यक्ती काम करीत आहेत.

**युनोच्या कार्याकारी संघटना :
१. महासभा (जनरल असेंब्ली) :
२. सुरक्षा समिती :
३. आर्थिक आणि सामाजिक समिती(श्र्छैश्ैछ) :
४. विश्वस्त समिती (ट्रस्टीशिप कौन्सिल) :
५. आंतरराष्ट्रीय न्यायालय :
६. सचिवालय :

*****महासभा (जनरल असेंब्ली) :

युनोचे सदस्य असलेल्या प्रत्येक राष्ट्राचा कमीत-कमी एक प्रतिनीधी महासभेचा सदस्य असतो. काही राष्ट्रे पाचपर्यंत प्रतिनिधी पाठवू शकतात. परंतु एक प्रत्येक राष्ट्राला एकाच मतांचा अधिकार असतो. महासभेतील सदस्य राष्ट्रांचे वर्षाला एक तरी अधिवेशन होतेच. सुरक्षा समितीच्या विनंतीवरून युनोचे सरचिटणीस विशेष अधिवेशन बोलावू शकतात. दरवर्षी महासभा आपला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडते, सुरक्षा समिती, आर्थिक व सामाजिक समिती, विश्वस्त समिती यांचे सदस्य निवडते, तसेच आंतरराष्ट्रीय न्यायलयाच्या न्यायमूर्तीची निवड करणे, युनोच्या वार्षिक अंदाजपत्रकाला मान्यता देणे व आर्थिक वा राजकीय महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी ठराव करणे इ. महासभेची प्रमुख कामे होत. अति महत्त्वाचे निर्णय घ्यावयाचे असल्यास २/३ बहुमताची गरज असते.

*****सुरक्षा समिती :

आंतरराष्ट्रीय शांतता टिकविणे हे या समितीचे प्रमुख काम. या समितीत पाच कायम स्वरूपी व दहा तात्पुरते (दोन वर्षासाठी) असे १५ सभासद असतात. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन हे कायम सभासद असून त्यांना नकाराधिकार (व्हेटो) वापरण्याच्या अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून बहुमतातील ठरावही फेटाळता येतो. समितीच्या अध्यक्ष दर महिन्याला बदलतो व सदस्यराष्ट्रांच्या इंग्रजी आद्याक्षरानुसार त्यांचा क्रम ठरतो. महासभेच्या सहाकार्याने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायमूर्तींची निवड करणे, सरचिटणीसाची निवड करणे, नव्या राष्ट्राला युनोचे सदस्य करणे किंवा जुन्याचे सदस्यत्व रद्द करणे इत्यादी गोष्टी सुरक्षा समितीच्या अधिकारात येतात. सुरक्षा समितीचे दहा तात्पुरते सदस्य पुढील प्रमाणे :- बांगलादेश, माली, टयुनिशिया, जमैका, युक्रेन, मॉरिशस, कोलंबिया, आयर्लंड, नॉर्वे, सिंगापुर (३१ डिसेंबर २००२)

****आर्थिक आणि सामाजिक समिती
आंतरराष्ट्रीय आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक करणे तसेच मानवी मूल्य आणि मुलभूत हक्क अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातून ही समिती काम करते. महासभेने २/३ बहुमताने निवडून दिलेल्या ५४ सभासदांचा या समितीत समावेश असतो. युरोप, आफि्रका, लॅटिन अमेरिका, प.आशिया, आग्नेय आशिया व प्रशांत महासागर या भागातील आर्थिक समस्या सोडविण्यासाठी या समितीअंतर्गत पाच प्रादेशिक आयोगांची निर्मिती करण्यात आली आहे.

****विश्वस्त समिती (ट्रस्टीशिप कौन्सिल) :

ज्या प्रदेशाला अजून पूर्ण स्वराज्य वा स्वायतत्ता मिळाली नाही अशा प्रदेशातील लोकांचे आर्थिक, राजकीय, सामाजिक हितसंबध जपण्याचे लक्ष्य असते. आतापर्यंत अशा प्रकारच्या ११ विश्वस्त प्रदेशांपैकी दहा विस्वस्त प्रदेश स्वतंत्र झाले. आहेत. विश्वस्त समितीने १४ सदस्य असतात. यातील ५ सुरक्ष समितीचे कायम सभासद असतात व उरलेले सभासद विश्वस्त प्रदेशाचा कारभार पाहणारी राष्ट्र असतात.

****आंतरराष्ट्रीय न्यायालय :

आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्याचे काम हे न्यायालय करते. न्यायालयात १५ न्यायाधीश असून प्रत्येक न्यायाधीशची मुदत ९ वर्षांची असते. मुदत संपल्यावर त्यांची पुनर्निवड होऊ शकते. एकाच देशाचे दोन न्यायाधीश असत नाहीत. न्यायालयाचे काम हेग येथून चालते. पण विशेष परिस्थितीत न्यायालयाचे सत्र इतरत्रही भरते.

****सचिवालय :
युनोचे सचिवालय न्यूर्यॉक येथे असून संघटनेचे कामकाज तेथून चालते. न्यायालयाचा प्रमुख सरचिटणीस असतो. तोच संघटनेचा मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी सुध्दा असतो. त्याच्या हाताखाली अवर-सचिव आणि सहायक सचिव असतात. सरचिटणीसाची नेमणूक महासभा करते. सरचिटणीसाची मुदत पाच वर्षांची असते पण मुदतीनंतर त्यांची पुनर्निवड होऊ शकते.

No comments:

Post a Comment